Latest

IOC President at Ambani House : अंबानी यांच्या घरी ऑलिम्पिक समिती अध्यक्ष थॉमस बाख यांचा पाहुणचार

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी त्यांच्या निवासस्थानी IOC चे अध्यक्ष थॉमस बाख यांचा पाहूणचार केला. बाख हे अंबानी कुटुंबाने केलेल्या पाहूणचारामुळे भारावले. IOC च्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी ते भारतात आले आहेत.

15-17 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत IOC चे 141 वे सत्र पार पडणार आहेय. IOC च्या या सत्रापूर्वी बाख यांना अंबानी कुटुंबाने आज (दि. ११) घरी बोलावले होते. त्यांच्या अग्रहानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अध्यक्ष थॉमस बाख यांनी अंबानी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या स्वागताची अंबानी कुटुंबाने जय्यत तयारी केली होती. निता अंबानी यांनी त्यांचे औक्षण केले. हे स्वागत पाहून थॉमस बाख यांना आनंद झाला.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) च्या 141 व्या सत्रापूर्वी, IOC चे अध्यक्ष थॉमस बाख म्हणाले की, भारताने ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात 'मोठे स्वारस्य' दाखवले आहे. ते असंही म्हणाले की T20 क्रिकेटला क्रीडा प्रकारात पुन्हा आणण्यासाठी हे योग्य माध्यम आहे.

2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भारताने भूषवण्याची शक्यता आहे असंही बाख यावेळी म्हणाले. अधिकृत बोली प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली तरी या शक्यतेचा गांभीर्याने विचार केला जात आहे.

SCROLL FOR NEXT