Latest

गुंतवणूक : अल्पकालीन उद्दिष्टांसाठी उत्कृष्ट गुंतवणूक फंड

अमृता चौगुले

आपली स्थावर मिळकत विकून आलेली मोठी रक्‍कम पुढील नियोजन होईपर्यंत एखाद्या व्यक्‍तीने कुठे गुंतवावी? एका व्यक्‍तीला सहा महिन्यांनी एक चांगले चारचाकी वाहन खरेदी करायचे आहे, तोपर्यंत त्याने जमवलेली रक्‍कम कुठे पार्क करावी? एका व्यक्‍तीला एक वर्षानंतर युरोप ट्रीप करायची आहे आणि त्यासाठी ती दरमहा रक्‍कम जमा करते आहे. ती कुठे करावी? चौथ्या व्यक्‍तीला शेअर मार्केटमध्ये किंवा इक्‍विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची आहे. परंतु बाजाराची अनिश्‍चितता टाळण्यासाठी एकरकमी गुंतवणूक न करता तिला दररोज Systematic Transfer Plan (STP) द्वारा गुंतवणूक करायची आहे. तर तिने एकरकमी गुंतवणूक बँकेव्यतिरिक्‍त कुठे करावी?

वरील प्रकारच्या सर्व व्यक्‍तींसाठी ज्यांची गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये अल्पकालीन म्हणजे 3 महिने ते 1 वर्ष एवढ्या मुदतीची आहेत, त्यांच्यासाठी एक अतिशय फंड प्रकार आहे आणि तो म्हणजे डेट फंड वर्गवारीतील Low Duration Fund! आज आपण या ङेु Low Duration Fund याबद्दल अधिक माहिती घेऊ!

Low Duration फंडामधील गुंतवणूक 6 ते 12 महिने मुदतीच्या debt instruments मध्ये होते. मग ती instruments सरकारी असतील व कॉर्पोरेट! सहा महिन्यांच्या पुढील मुदतीच्या साधनांमध्ये गुंतवणूक केल्यामुळे Low Duration फंड हे लिक्‍विड किंवा Ultra Short Duration फंडापेक्षा किंचित अधिक जोखमीचे असतात. डेट फंडांना खपींशीशीीं ठळीज्ञ ची जोखीम सदैव असते. म्हणजे फंडाची गुंतवणूक जर तीन वर्षांपेक्षा अधिक मुदतीच्या रोख्यांमध्ये असेल आणि व्याजदर वाढले, तर त्या राख्यांचे बाजारातील मूल्य कमी होते; परंतु Low Duration फंडांमधील गुंंतवणूक ही 6 महिने ते 1 वर्ष मुदतीच्या साधनांमध्ये होत असल्यामुळे इतर डेट फंडांपेक्षा Low Duration फंडांना nterest Rate Risk खूप कमी असते.

परंतु Low Duration फंडांच्या बाबतीत एक सावधगिरी घ्यावी लागते, ती म्हणजे फंडाची गुंतवणूक ज्या साधनांमध्ये आहे, त्या साधनांची Credit Quality तपासून घेण्याचे एक कारण – या प्रकारच्या फंडांची गुंतवणूक कोणत्या साधनांमध्ये आणि कोणत्या Credit Rating च्या साधनांमध्ये करावी, यावर सेवांचे कोणतेही साधन नाही. फंड मॅनेजर मनी मार्केट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कॉर्पोरेट बाँडस्, डेरीव्हेटीज् किंवा म्युच्युअल फंड असा कोणत्याही साधनांमध्ये गुंतवणूक करू शकतो.

या वर्गातील एक उत्कृष्ट फंड आहे – UTI Treasury Advantage Fund! 24 एप्रिल 2007 रोजी तो सुरू झाला. तेव्हापासून या फंडाने सरासरी वार्षिक 7.19 टक्के परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांमध्ये सरासरी 7.16 टक्के तर मागील एका वर्षांमध्ये सरासरी 8.77 टक्के असा बँकेपेक्षा अधिक परतावा दिला आहे. फंडाची एकूण गुंतवणूक A1+, AA+, Sor आणि AAA  रेटिंगच्या साधनांमध्ये आहे. अनुराग मित्तल हे या फंडाचे व्यवस्थापन पाहतात. या फंडाचा Experse Ratio 9.43 टक्के आहे. केवळ 500 रुपयेच्या किमान गुंतवणुकीने आपल्याला या फंडामध्ये सहभागी होता येते. या फंडाचे आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे या फंडाला Exit Load नाही.

UTI Treasury Advatage फंडामध्ये (किंवा कोणत्याही Low Duration फंडांमध्ये) कुणी गुंतवूणक करावी?
1) ज्यांना शेअर बाजाराीतल अनिश्‍चितता नको आहे.
2) ज्यांना तुलनेने अत्यल्प nterest Rate Risk हवी आहे.
3) ज्यांना बँकेतील मुदत ठेवीपेक्षा थोडा अधिक परतावा हवा आहे.
4) ज्यांना Taxation च्या द‍ृष्टीने अधिक लाभदायक गुंतवणूक हवी आहे.

ज्यांची उद्दिष्ट्ये वर सांगितल्याप्रमाणे आहेत, त्यांच्यासाठी हा फंड उत्कृष्ट तर आहेच. परंतु ज्यांना नियमित मासिक उत्पन्‍न हवे आहे, त्यांनी या फंडामध्ये एकरकमी गुंतवणूक करून ठराविक टक्केवारीने डथझ द्वारा मासिक उत्पन्‍न घेतल्यास त्यांना बँकेपेक्षा अधिक उत्पन्‍न दरमहा मिळेलच, शिवाय त्यांच्या मुदलामध्येही वाढ होऊन Capital Gain चाही लाभ होईल. ज्यांना एखाद्या इक्‍विटी फंडांमध्ये SWP द्वारा दररोज किंवा दर आठवड्याला गुंतवणूक करायची आहे, त्यांनी या फंडामध्ये गुंतवणूक करावी कारण या फंडाला Exit Load  नाही.

Low Duration फंडाना डेट फंडांचे टॅक्सेशन लागू होते. तीन वर्षांच्या आत या फंडामधील गुंतवणूक काढून घेतली, तर मिळणारा लाभ आपल्या Income Tax Slab नुसार कपात होतो. तीन वर्षांच्या पुढील भांडवली लाभावर आपल्याला खपवशुरींळेप चा फायदा मिळतो. SWP द्वारा या फंडातून कसा फायदा होतो, ते पाहण्यासाठी खालील उदाहरण पाहा.
फंडाचे नाव UTI Treasury Advantage Fund

गुंतवणूक रक्‍कम : रु. 1 लाख
गुंतवणूक दिनांक : 1 ऑगस्ट 2019
दरमहा काढलेली रक्‍कम : रु. 500 (वार्षिक 6 टक्के दराने)
शेवटचा दिनांक ः 1 ऑगस्ट 2022
एकूण मुदत ः 36 महिने
एकूण काढलेली रक्‍कम ः रु. 18000/- (6 टक्के दराने)
गुंतवणुकीचे आजचे मूल्य ः रु. 1,03,346
सरासरी वार्षिंक परतावा ः
716 टक्के.

ज्यांची गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये अल्पकालीन म्हणजे 3 महिने ते 1 वर्ष एवढ्या मुदतीची आहेत, त्यांच्यासाठी एक अतिशय चांगला फंड प्रकार आहे आणि तो म्हणजे डेट फंड वर्गवारीतील Low Duration Fund!

-भरत साळोखे 

SCROLL FOR NEXT