Latest

International Tea Day : लसणाचा चहा प्यायल्याने ‘हे’ आहेत सर्वोत्तम फायदे

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : लसूण भारताच्या प्रत्येक स्वयंपाक घरात महत्वाचा भाग असतो. आपलं जेवण टेस्टी करण्याचं काम लसूण (International Tea Day) करतं. परंतु तुम्हाला माहीत आहे का? लसूण उत्तम आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आपण लसणाच्या चहापासून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार करू या. रिकाम्या पोटी सकाळी एका पाण्याच्या ग्लासमध्ये लसणाचा वापर करून प्यायलो तर, आरोग्याच्या कोणत्या तक्रारी पळून जातात, हे पाहू या…

पचनक्षमता वाढते : रिकाम्या पोटी लसणाचा चहा प्यायल्याने मेटाबाॅलिज्म वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आपली पचनक्षमता दुपटीने वाढते.

हृदय निरोगी राहते : लसणाच्या चहाने हृदयविकाराचा त्रास होत नाही आणि हृदयाच्या अनेक व्याधी कमी होतात. त्याचबरोबर रक्ताभिसरणाला प्रोत्साहन देते. (International Tea Day)

पित्ताचा त्रास कमी होतो : आपल्या शरीरातील विषारी द्रव्यांना बाहेर काढण्यास लसणाचा चहा खूप महत्त्वाची मदत करतो. तसेच पित्ताचा त्रासही कमी होतो.

वजन कमी करते : सर्वात महत्वाचे… वजन कमी करण्यास लसणाचा चहा अत्यंत महत्वाचा आहे. कारण, भूखेला थांबवून ठेवण्याची शक्ती लसणाच्या चहात आहे आणि खाण्यावर नियंत्रण ठेवण्यात लसणाचा चहा मदत करतो.

कोलेस्ट्रेराॅल नियंत्रीत राहतो : लसणाचा चहा कोलेस्ट्रेराॅल असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि डाॅक्टरही तो सल्ला देतात. तसेच कोलेस्ट्रेराॅलसंबंधित विकार कमी करण्यास मदत करते.

लसणाचा चहा कसा तयार कराल? 

हा लसणाचा चहा कसा तयार करायचा, हा प्रश्न पडला असेल? तर, सोप्पं आहे. तीन कप पाणी घेऊन त्याला उकळवा. त्यात ३-४ लसणाच्या फोडी कापून टाका. काही मिनिटांपर्यंत उकळू द्या. त्यात लिंबाचा रस आणि मध मिसळा. त्याचबरोबर आलेदेखील टाका. झाला तुमचा लसणाचा चहा. हा चहा तुम्ही दिवसभर वापरू शकता.

व्हिडीओ पहा : स्वा.सावरकरांच्या विचारांतूनच भारत महासत्ता| पुढारीकार पद्मश्री डॉ. ग. गो जाधव स्मृती व्याख्यानमाला

SCROLL FOR NEXT