Latest

Ajit Pawar: राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा मानस: अजित पवार

अविनाश सुतार

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर पर्यंत न्यायची आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था देखील एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचा आपला मानस आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती येथे दिली. Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत.अमरावती मधील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. दरम्यान त्यांनी अमरावतीच्या सायन्स स्कोर मैदानावर आयोजित "क्रेडाई अमरावती ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्सपो 2023 च्या सोहळ्याला" हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत आणि बांधकाम क्षेत्राबाबत मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी देखील राज्याची अर्थव्यवस्था वन ट्रिलियन डॉलर पर्यंत कशी पोहोचेल, याबाबत प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले. Ajit Pawar

राज्यातील अर्थचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर बांधकाम क्षेत्राचा देखील त्यामध्ये खूप मोठा वाटा असतो. राज्याच्या जीडीपी मध्ये देखील त्यांचे योगदान असतं. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. क्रेडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेमार्फत बांधकाम व्यवसायाला योग्य दिशा देण्याचे काम केलं जात आहे, असे गौरवपूर्ण उद्गारही त्यांनी काढले.

आमदार प्रविण पोटे पाटील, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देविदास पवार, क्रेडाई अमरावतीचे अध्यक्ष निलेश ठाकरे, उपाध्यक्ष कपिल आडे, सचिव रवींद्र गोरटे आदी यावेळी उपस्थित होते.

आयुक्त तुम्ही आधी कुठे होतात?

या कार्यक्रमादरम्यान त्यांना अमरावती महानगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्स हा २०० पट अधिक केल्याची माहिती दिल्यामुळे, त्यांनी चक्क अवाक होत महापालिका आयुक्त तुम्ही आधी कुठे होतात? असा सवाल उपस्थित केला. संपत्ती करा बाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.

 अमरावतीत नागपूर पेक्षा अधिक दर

बांधकाम व्यवसायिकांनी केवळ दोन पैसे आपल्याला मिळाले पाहिजे याच उद्देशातून व्यवसाय न करता गरीबाचे कल्याण कसं होईल याकडेही लक्ष द्यावं असेही अजित पवार म्हणाले. अमरावतीमध्ये नागपूर पेक्षाही जमिनीचे भाव हे अधिक आहेत असे आपल्याला समजले आहे, याचे नेमकं कारण काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.