Latest

Heart attack : अपुर्‍या झोपेने वाढतो हार्ट अ‍ॅटॅकचा धोका

Arun Patil

न्यूयॉर्क : शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रात्रीची पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची ठरते. जर पुरेशी झोप मिळाली नाही तर मानवी शरीर अनेक आजारांचे घर बनू लागते. यापूर्वी करण्यात आलेल्या अनेक संशोधनानुसार पुरेशी झोप न घेतल्यास तणाव आणि कार्डिओवॅस्कूलर आजाराचा धोका वाढतो. यासंदर्भात करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार जर रात्रीच्या वेळी पाच तासांहून कमी झोप घेतल्यास पायापर्यंत रक्त पोहोचवणार्‍या धमण्या क्लॉग म्हणजे जाम होऊ शकतात.

यामुळे स्ट्रोक आणि हार्ट अ‍ॅटॅकचा धोकाही अनेक पटीने वाढू शकतो. ग्लोबल डायबेटस् कम्युनिटीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन अहवालातील निष्कर्षानुसार रात्रीच्या वेळी पाच तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने परिफेरल आर्टरी डिसिजचा (पीएडी) धोका 74 टक्यांपर्यंत वाढतो. पीएडी ही एक अशी स्थिती आहे की, त्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा प्रवाह कमी होऊ लागतो.

अपुर्‍या झोपेने संपूर्ण शरीरातील धमन्यांच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा प्रभावित होऊ शकतो. दरम्यान, अपुर्‍या झोपेने कोरोनरी आर्टरी डिसिजचा धोका बळावतो, असे यापूर्वीच्या अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले होते. मात्र, अपुर्‍या झोपेमुळे पीएडीचा आजारा होऊ शकतो, हे पहिल्यांदाच स्पष्ट झाले आहे. सध्या जगभरात या आजाराने सुमारे 20 कोटी लोक त्रस्त आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT