Latest

सांगली, सातारा ,सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी करा : आमदार विश्वजीत कदम

backup backup

पलूस; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची तातडीने पाहणी करणे गरजेचे आहे. परंतु दुष्काळग्रस्तांना मदत करताना राज्यसरकार दुजाभाव करीत असल्याचा प्रकार संतापजनक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त पथकाकडून पाहणी करावी अशी मागणी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी आज (दि. १३) अधिवेशनात केली.

सध्या दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. परंतु या पथकाला पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुके दिसत नाहीत का असा सवाल सरकारला केला. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लोकांना पिढ्यंपिढ्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.परंतु तरीदेखील या दुष्काळग्रस्त तालुक्याचा यामध्ये समवेश केलेला दिसून येत नाही. यामुळे लोकांच्यामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या भागातील लोकांनी जिल्हाधिकारी यांनी मोर्चा काढून आंदोलन केले आहे. आंदोलन करून सुद्धा सरकारने कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना मदत करताना असा दुजाभाव करणे अतिशय संतापजनक आहे. ही बाब आम्ही वारंवार राज्य सरकारच्या देखील निदर्शनास आणून दिली असल्याचे कदम यांनी सांगितले.

विशेषतः सांगली जिल्ह्यातील शिराळा, खानापूर-विटा, कडेगाव, मिरज कवठेमहांकाळ, जत, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांमध्ये गेली ३०-३५ वर्षे दुष्काळाशी संघर्ष करावा लागत आहे. त्या ठिकाणी तातडीने पाहणी करून सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी कदम यांनी अधिवेशनात केली.

SCROLL FOR NEXT