Latest

INS Vikrant: ‘आयएनएस विक्रांत’ आज होणार भारतीय नौदलात दाखल, भारताच्या सागरी इतिहासातील सर्वात मोठे जहाज

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: आजचा दिवस हा देशासाठी ऐतिहासिक आहे. कारण स्वदेशी बनावटीची 'आयएनएस विक्रांत' ही भारताची पहिली युद्धनौका नौदलात आज दाखल होणार आहे. ही स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' भारतीय नौदलाला सुपूर्द करणार आहेत. भारताच्या सागरी इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे जहाज आहे. केरळमधील कोची येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही नौका दाखल होणार आहे.

४० टन विमानवाहू युद्धनौका तयार करणाऱ्या जगातील सहा देशांच्या यादीत आता भारताचाही समावेश होणार आहे. या आयएनएस विक्रांतचा भारताच्या युद्ध ताफ्यात समावेश झाल्याने, इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि स्थिरता राखण्यास मदत होणार आहे. आयएनएस विक्रांतवर ३० विमाने तैनात करण्याची क्षमता आहे. यामध्ये २० लढाऊ विमाने, १० हेलिकॉप्टर असणार आहेत. सध्या विक्रांतवर मिग-29 हे लढाऊ विमाने तैनात केली जातील.

पंतप्रधानांनी ट्विट करून दिली माहिती

पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करत आयएनएस विक्रांतची माहिती दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, "संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रयत्नांसाठी 2 सप्टेंबर हा ऐतिहासिक दिवस आहे. आज पहिली स्वदेशी बनावटीचे विमानवाहू जहाज INS विक्रांत कार्यान्वित होणार आहे. यावेळी नवीन नौदल चिन्हाचेही अनावरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT