Latest

मधमाश्यांच्या पोळ्यातून शहराचीही समजते माहिती!

Arun Patil

न्यूयॉर्क : मधमाश्या आणि त्यांचे पोळे हे अनेक बाबतीत अभ्यासाचा विषय ठरलेले आहे. आता एका नव्या संशोधनात म्हटले आहे की, मधमाश्यांच्या पोळ्यांमध्ये संबंधित शहरांचीही अनेक रहस्ये दडलेली असू शकतात. मधमाश्या शहराच्या आरोग्याबाबतही महत्त्वाची माहिती बाळगतात. त्या शहराचे सूक्ष्मजीवन बारकाईने समजून घेतात. त्यांना अन्नासाठी सुमारे 1 मैल अंतर कापावे लागते. अशात ते अनेक पदार्थ, जिवाणूसह अन्य बाबी एकत्र करतात. हे त्यांच्या पोळ्यात कचर्‍याच्या रूपात जमा होतात.

संशोधक केविन स्लेविन आणि त्यांच्या टीमला दिसले की, मधमाश्यांच्या पोळ्याच्या अवशेषात शहरी वातावरणातील खूप सारी माहिती प्रदान करतात. हे सूक्ष्मजीव आणि आरोग्याशी संबंधित असतात. यामुळे माणसे, मधमाश्या आणि शहरी परिस्थितीकी तंत्राच्या गुंतागुंतीच्या क्रियांची माहिती मिळू शकते. हे सूक्ष्मजीव व शहरी नियोजन व आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात.

संशोधकांच्या टीमने न्यूयॉर्क, व्हेनिस, टोकियो, मेलबोर्न आणि सिडनी या शहरांतील सूक्ष्मजीवांचे विश्लेषण करून मधमाश्यांचा मध, मधमाशीचे अवयव आणि पोळ्याच्या अवशेषांतून मिळणार्‍या सूक्ष्मजीवांचा नमुना घेतला. त्यामधून त्यांना मधमाश्यांच्या पोळ्यांमध्ये संबंधित शहरांमधील अशी वैशिष्ट्येे गवसतात हे दिसून आले.

SCROLL FOR NEXT