पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील नोएडा येथे सोमवारी संध्याकाळी एका मजुराच्या सात महिन्यांच्या मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. सोमवारी संध्याकाळी एका सोसायटीच्या गेटजवळ ही घटना घडली. यानंतर या बाळाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. या हल्ल्यात भटक्या कुत्र्याने बाळाची आतडी बाहेर काढली होती. यानंतर त्याला नोएडा येथील एका रूग्णालयात दाखल करून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, परंतू ती अयशस्वी झाली.
काल रात्रभर गंभीर अवस्थेत असलेल्या या ७ महिन्याच्या बाळाचा आज मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सोसायटीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर सोसायटीतील संतप्त नागरिकांनी एकत्र येत नोएडा प्राधिकरणाकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.