Latest

INDW vs AUSW ODI : भारताचे ऑस्ट्रेलियाला 283 धावांचे लक्ष्य

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDW vs AUSW ODI : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज (28 डिसेंबर) पहिला सामना खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात आठ गडी गमावून 282 धावा केल्या. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावा केल्या. पूजा वस्त्राकरने नाबाद 62 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून ॲशले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डार्सी ब्राउन, अॅनाबेल सदरलँड, मेगन शुट आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्माने निराशा केली. ती एक धाव करून बाद झाली. तिला डार्सी ब्राउनने बोल्ड केले. यानंतर यस्तिका भाटियाने ऋचा घोषसोबत दुसऱ्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. ऋचा 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 21 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर काही विशेष करू शकली नाही आणि नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यास्तिकचे अर्धशतक हुकले. 64 चेंडूत 49 धावा करून ती बाद झाली. यानंतर दीप्ती शर्माने 21, अमनजोत कौनने 20 आणि स्नेह राणाने एका धावेचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जचे शतक हुकले. तिने 77 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी खेळली. शेवटी पूजा वस्त्राकरने जलद धावा करत उत्कृष्ट अर्धशतक झळकावून टीम इंडियाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

दोन्ही संघ
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष, सायका इशाक, अमनजोत कौर, रेणुका सिंह ठाकूर, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा.

ऑस्ट्रेलिया : अ‍ॅलिसा हिली (कर्णधार), बेथ मूनी, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, ताहिला मॅकग्रा, डार्सी ब्राउन, अलाना किंग, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरहॅम.

SCROLL FOR NEXT