Latest

Indonesia landslide: इंडोनेशियात मोठी दुर्घटना; भूस्खलनात १४ जणांचा मृत्यू

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर अतिमुसळधार पावसामुळे भूस्खलनाची दुर्घटना आज (दि.१४) घडली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. बेपत्ता झालेल्या लोकांसाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबविले जात आहे, असे वृत्त 'रॉटर्स' या वृत्तसंस्थेने दिले आहे. (Indonesia landslide)

एजन्सीचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अति-तीव्रतेच्या पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे दक्षिण सुलावेसीमधील ताना तोराजा प्रदेशातील दोन गावे प्रभावित झाली. अतिमुसळधार पावसामुळे येथील १४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर किमान २ जण बेपत्ता आहेत. यामध्ये येथील घरांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे रॉटर्सने वृत्तात म्हटले आहे. (Indonesia landslide)

रविवारी दुपारपर्यंत बचावकर्त्यांनी मकाले गावात किमान 11 मृतदेह आणि दक्षिण मकालेमध्ये तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. अजूनही 3 वर्षांच्या मुलीसह इतर तिघांचा शोध सुरू आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले. ढासळलेल्या दळणवळणाच्या लाईन्स, खराब हवामान आणि अस्थिर मातीमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते, असे मुहारी म्हणाले.

इंडोनेशियात जवळपास 17,000 बेटांची साखळी आहे. जिथे लाखो लोक डोंगराळ भागात किंवा सुपीक पूर मैदानात राहतात. इंडोनेशियामध्ये मोसमी पावसामुळे वारंवार भूस्खलन आणि पूर येत असतात.

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT