Latest

मुंबईतील भिकार्‍याची संपत्ती 7.5 कोटी रुपये

Arun Patil

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भिकारी म्हटले की, डोळ्यांसमोर कृश शरीरयष्टी, फाटलेले कपडे, न विंचरलेले केस… अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणारा माणूस येतो. दोनवेळच्या जेवणाची वानवा असल्याने तो भीक मागतो. परंतु, हा भिकारी कोट्यधीश असेल तर… त्याचे मासिक उत्पन्न तुमच्यापेक्षाही जास्त असेल तर… त्याच्याकडे तुमच्यापेक्षाही जास्त संपत्ती असेल तर… होय, मुंबईतील एका कोट्यधीश भिकार्‍याचे महिन्याचे उत्पन्न चक्क 75 हजार रुपये आहे. एवढेच नाही, तर आलिशान फ्लॅटसह त्याची तब्बल 7.5 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

भारत जैन याच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. त्यामुळे त्याला शिक्षणही घेता आले नाही. कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवणेही कठीण असल्याने तो भीक मागण्याकडे वळला. त्याने मुंबईच्या वेगवेगळ्या रस्त्यांवर भीक मागण्यास सुरुवात केली. सध्या तो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते आझाद मैदान यादरम्यान रस्त्यावर भीक मागतो.त्याचे लग्न झाले आहे. त्याच्या कुटुंबात वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याचा मुंबईत दोन बेडरूमचा आलिशान फ्लॅट असून, त्याची किंमत चक्क 1 कोटी 20 लाख रुपये आहे. एवढेच नव्हे, तर ठाण्यात त्याच्या मालकीची दोन दुकाने आहेत.

संपत्ती जमली असली, तरी भारत जैन दररोज भीक मागतो. तो एकही दिवस भीक मागायचे चुकवत नाही. त्याचे रोजचे उत्पन्न सुमारे 2 हजार ते 2 हजार 500 रुपयांवर जाते. दररोज साधारपणे तो 10 ते 12 तास भीक मागतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT