Latest

Indian Railway News | IRCTC ची रेल्वे तिकीट बुकिंग सेवा पुर्ववत; तब्बल १३ तासांहून अधिक वेळ ठप्प होती रेल्वेची सेवा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : रेल्वे तिकीट बुकिंगची वेबसाईट आणि अॅप सेवेत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे तब्बल १३ तास रेल्वेची सेवा बंद होती. यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर रेल्वेची तिकीट बुकिंग सेवा पूर्ववत झाल्याची माहिती भारतीय रेल्वेने (IRCTC) ट्विटरवरून (Indian Railway News) दिली आहे.

भारतीय रेल्वेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, तिकीट बुकिंगची समस्या आता सुटली असून, https://irctc.co.in/nget/train-search ही वेबसाईट आणि रेल कनेक्ट अॅप आता कार्यरत झाले आहे. आमच्याकडून झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करत आहे, असे देखील भारतीय रेल्वेने म्हटले आहे.

रेल्वे तिकीट बुकिंगसाठीची आयआरसीटीसीची वेबसाईट मंगळवारी सकाळपासून ठप्प झाली होती. यामुळे तिकीट काढू इच्छिणाऱ्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या महानगरांप्रमाणे छोट्या शहरातील लोकांनाही सेवा ठप्प पडल्याने रेल्वेचे तिकीट काढता आले नाही किंवा बुकींग देखील करता आले नाही.
केवळ वेबसाईटच नव्हे तर आयआरसीटीसीच्या ऍपवरही समस्या निर्माण झाली होती. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लॉगइन केल्यानंतर 'देखभालीचे काम सुरु असल्याने सर्व सुविधा आता प्रभावित आहेत' असा संदेश येत होता. दरम्यान तिकीट बुकिंग करण्यात अडचणी येत असल्याचे खुद्द आईआरसीटीसीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आले होती. यानंतर आयआरसीटीसीने पुन्हा ट्विट करत भारतीय रेल्वेची ही सेवा पुर्ववत झाल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT