Latest

एक अब्‍ज डॉलर फसवणूक प्रकरणी अमेरिकेतील भारतीय वंशाचे दोन उद्योगपती दोषी, होवू शकते ३० वर्षांच्‍या कारवासाची शिक्षा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तब्‍बल १ अब्‍ज डॉलर्सच्‍या फसवणूक प्रकरणात दोन भारतीय वंशाच्‍या उद्योजकांना दोषी ठरवण्यात आले असून, त्यांना जास्तीत जास्त 30 वर्षांची शिक्षा होऊ शकते. जाणून घेवूया हे संपूर्ण प्रकरण काय आहे याविषयी…

अशी केली आर्थिक फसवणूक

स्‍टार्ट-अपच्‍या माध्‍यमातून शिकागो येथील भारतीय वंशाचे नागरिक ऋषी शहा आणि श्रद्धा अग्रवाल यांनी आरोग्‍य तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी आउटकम हेल्थ नावाची कंपनी सुरु केली. कंपनीने अमेरिकेतील डॉक्टरांच्या कार्यालयात टेलिव्हिजन स्क्रीन आणि टॅब्लेट वाटप केले. येथील जाहिरातीची जागेसाठी ग्राहक व गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले. तसेच त्‍यांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवले होते. फसवणूक झालेल्‍या बहुतांश औषध कंपन्या होत्या.

फसवणूक प्रकरणी ठरले दोघे दोषी

ग्राहक आणि कंपनीतील गुंतवणूकदारांची १ अब्‍ज डॉलर्सची फसवणूक केली. या प्रकरणी ऋषी शहा आणि श्रद्धा अग्रवाल यांच्‍यावर अनुक्रमे २२ आणि १७ गुन्‍हे दाखल झाले होते. यामध्‍ये दोघेही दोषी आढळले आहेत. या आर्थिक फसवणूक प्रकरणाची सुनवाणवी १० आठवडे चालली. आउटकम हेल्थचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ ऋषी शहा आणि माजी अध्यक्षा श्रद्धा अग्रवाल हे विविध गुन्‍ह्यांत दोषी आढळले आहेत.

३० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा शक्‍य

३७ वर्षीय ऋषी शहा यांना मेल फ्रॉडच्या पाच गुन्ह्यांमध्ये, वायर फसवणुकीच्या १० गुन्ह्यांमध्ये, बॅंक फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांमध्ये आणि मनी लाँड्रिंगच्या दोन गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. बँक फसवणुकीप्रकरणी जास्तीत जास्त ३० वर्षे तुरुंगवास आणि मेल फसवणूक प्रकरणी २० वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो. मनी लाँड्रिंगच्या प्रत्येक गुन्ह्यात शहा यांना १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT