Latest

Indian Couple Death : भारतीय वंशाच्या जोडप्याचा अमेरिकेत खून झाल्याचा संशय; दोन मुलांसह राहत्या घरी चौघांचे मृतदेह

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील न्यू जर्सी भागात भारतीय वंशाचे जोडपे आणि त्यांची दोन मुले राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी हा खून असल्याचा संशय व्यक्त करत अधिक तपास सुरु केला आहे.

तेज प्रताप सिंग (वय 43), आणि सोनल परिहार (वय 42) असे या जोडप्याचे नाव आहे. या जोडप्यासह 10 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी असा चौघांचाही राहत्या घरात मृतदेह आढळून आला. प्लेन्सबोरो या भागात ते राहत होते. बुधवारी (दि. ४) दुपारी ४:३० नंतर मृतावस्थेत आढळले, असल्याची माहिती प्लेन्सबोरो पोलीस विभागाने दिली.

मिडलसेक्स काउंटी अभियोक्ता योलांडा सिकोन आणि प्लेन्सबोरो पोलिस विभागाचे मुख्य इमन ब्लँचार्ड यांनी गुरुवारी (दि. ५) दिलेल्या माहितीनुसार या चौघांच्या हत्याकांडाचा तपास सुरू आहे.

जालौन जिल्ह्यातील ओराई भागातील पटेल नगर येथे राहणारा सॉफ्टवेअर इंजिनीअर तेज प्रताप सिंग अनेक दिवसांपासून आपल्या कुटुंबासह अमेरिकेतील प्लेन्सबोरो येथील न्यू जर्सी शहरात राहत होते. तेज प्रताप सिंगही वेळोवेळी भारतात येत असून त्यांच्या कुटुंबीयांना भेटत होते. गेल्या बुधवारी न्यू जर्सीहून ओराई येथील पटेल नगर येथील घरी माहिती पोहोचली की 45 वर्षीय तेज प्रताप, त्यांची 40 वर्षीय पत्नी सोनल, 10 वर्षांचा मुलगा आयुष, 6 वर्षांची मुलगी एमी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. हे ऐकून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते जोरजोरात रडू लागले. हा आक्रोश ऐकून आजूबाजूचे लोक सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरी पोहोचले आणि कुटुंबाचे सांत्वन केले. अभियंता दाम्पत्य आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह सातासमुद्रापार भारतात कसे आणायचे, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला आहे. सध्या हे कुटुंब अमेरिकेतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून माहिती गोळा करत आहे.

SCROLL FOR NEXT