पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय परराष्ट्र मंत्रायलाचे शिष्टमंडळ दौर्यावर असतानाच चिनी अधिकाऱ्यांच्या नेपाळ भेटीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त नेपाळी न्यूज वेबसाइट myRepublica ने दिले आहे. ( Jaishankar Nepal Visit )
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर गुरुवारी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर होते. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या भेटीदरम्यान, जयशंकर यांना माहिती मिळाली की, चीनच्या युनान प्रांतीय समितीच्या स्थायी समितीचे उपसचिव शी युगांग हेही यावेळी उपस्थित आहेत. शी युगांग विमानतळावरून थेट मॅरियट हॉटेलमध्ये गेले, जिथे त्यांच्या आणि त्यांच्या सोबतच्या टीमसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या दौऱ्यात नेपाळने चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिल्याबद्दल एस जयशंकर यांनी नाराजी व्यक्त केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या नेपाळ दौऱ्यादरम्यान चिनी अधिकारी येणार असल्याची माहिती नेपाळी अधिकाऱ्यांना आधीच होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळ सरकारला चीनच्या पदाधिकार्यांची भेटी टाळण्याची विनंतीही केली होती.
चिनी अधिकाऱ्यांचा दौराही पूर्वनियोजित होता. तो पुढे ढकलण्यासाठी नेपाळ सरकारकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून चिनी अधिकाऱ्यांच्या अधिकृत कार्यक्रमांची माहिती देण्यात आलेली नाही किंवा त्याचे वेळापत्रकही जारी करण्यात आलेले नाही.
गुरुवारी काठमांडू विमानतळावर पोहोचल्यानंतर, जयशंकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केली होती की, "2024 च्या माझ्या पहिल्या भेटीसाठी नेपाळमध्ये परत आल्याने आनंद झाला. पुढील दोन दिवसांच्या व्यस्ततेची वाट पाहत आहे."
हेही वाचा :