Latest

Helicopter Crash : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, पायलटचा मृत्यू

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले (Helicopter Crash). या अपघातात पायलटचा मृत्यू झाला असून, तर को-पायलट गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी बचावकार्याची तयारी सुरू केली आणि काही वेळातच बचाव पथक बर्फाळ भागात पोहोचले. संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले की, पायलटला वाचवता आले नाही, परंतु को-पायलट जखमी अवस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीत्ता हेलिकॉप्टर (Helicopter Crash) गुरेझच्या तुलैल भागात नियमित उड्डाण करत होते. यावेळी त्यांचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. नंतर हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कर आणि हवाई दलाने तातडीने बचाव पथक या भागात पाठवले.

'चीत्ता' हे एक सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आहे, ज्यामध्ये मूव्हिंग मॅप डिस्प्ले, ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम आणि वेदर रडार यांसारखी प्रमुख वैशिष्ट्ये नाहीत. यात ऑटोपायलट यंत्रणाही नाही, ज्यामुळे खराब हवामानात वैमानिकाला खूप त्रास होतो. लष्कराकडे सध्या २०० चीत्ता हेलिकॉप्टर आहेत.

SCROLL FOR NEXT