Latest

मूळ अमेरिकनपेक्षा भारतीय अमेरिकन अधिक श्रीमंत!

मोहन कारंडे

नई दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकन संसदेत दिवाळी सुरू झाली. संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) हिंदू मंदिर उभारले गेले. राजीव शाह, निक्की हॅली यांचे राजकीय वर्चस्व होतेच, पण अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष पदापाठोपाठ ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर मूळ भारतीयांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय एनआरआय दबदब्याचा कळस ठरली! एनआरआयचे राजकीय वर्चस्व आहेच, आर्थिक वर्चस्वही सिद्ध झाले. उदाहरणार्थ एका ताजा आकडेवारीनुसार मूळ अमेरिकन लोकांचे वार्षिक सरासरी उत्पन्न ५० हजार डॉलर आहे, तर अमेरिकन मूळ भारतीयांचे वार्षिक सरासरी उत्पन्न ८९ हजार डॉलर आहे.

भारतातून परदेशात नोकरी- धंद्यानिमित्त लोक जाऊ लागले तशी भारतात ब्रेन ड्रेनची ओरड होऊ लागली होती. ब्रेन ड्रेन म्हणजे कुशल माणसांची देशाला गरज असताना त्यांचे परदेशी जाणे. नंतर अगडबंब कंपन्यांचे सीईओ भारतीय बनू लागले. प्रवासी भारतीयांनी (एनआयआय) २०२१ मध्ये ८७ अब्ज डॉलर (६.५ लाख कोटी रुपये) भारतात पाठविले आणि हे 'मनी गेन' 'ब्रेन ड्रेन'च्या गलक्यावर भारी ठरले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला व्हेटो पॉवर मिळावी म्हणून चीन, पाकिस्तान वगळता जग भारताच्या बाजूने एकवटत असताना परदेशातील मूळ भारतीयांची लॉबिंग या दृष्टीने महत्त्वाची ठरते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००३ मध्ये ९ जानेवारी 'आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस' म्हणून साजरा करण्याची परंपरा का सुरू केली, त्याचे उत्तर यात दडलेले आहे.

एनआरआय किती, कुठे, कसे ?

  • युनोच्या स्थलांतर अहवालानुसार जगभरात १.८० कोटी प्रवासी भारतीय आहेत.
  • सर्वाधिक ७०% अमेरिकेत यूएई, सौदी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडातही
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्रशासनात ८० वर मूळ भारतीय, ब्रिटन, कॅनडात हीच स्थिती
  • प्रियांका चोपडा, फ्रीडा पिंटो, मीरा नायर ही हॉलीवूडमधील सध्याची आघाडीची नावे

ब्रेन ड्रेन या संकल्पनेचे परिवर्तन आम्ही ब्रेन गेनमध्ये करण्याच्या मार्गावरून वाटचाल सुरू केली आहे. अन्य देशांत राहाणाऱ्या भारतीयांना कमाल सुविधा देण्यावर म्हणूनच आमचा भर आहे. देशाला यातून फायदाच फायदा आहे, हे लक्षा ठेवा.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

SCROLL FOR NEXT