Latest

Indian Air Force ने UFO च्या शोधासाठी २ राफेल लढाऊ विमाने पाठवली; जाणून घ्या काय झालं

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन ; भारतीय हवाई दलाने इम्फाळ विमानतळाजवळ अज्ञात उडणारी वस्‍तू (UFO) शोधण्यासाठी राफेल हे लढाऊ विमान तात्‍काळ पाठवले. या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, काल (रविवार) इम्फाळ विमानतळाजवळ अनोळखी उडती वस्तू दिसल्याची माहिती मिळाली. यानंतर लगेचच त्‍या उडत्‍या संदिग्‍ध वस्‍तूच्या शोधासाठी राफेल लढाऊ विमान पाठवण्यात आले.

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, प्रगत सेन्सरने सुसज्ज असलेल्या फायटर जेटने यूएफओचा शोध घेण्यासाठी त्‍या हवाई क्षेत्रातील खालच्या पातळीवरून उड्डाण केले, परंतु तेथे भारतीय हवाई दलाला काहीही सापडले नाही. त्यांनी सांगितले की, पहिले विमान परत आल्यानंतर दुसरे राफेल लढाऊ विमान पुन्हा त्‍या संदिग्‍ध वस्‍तूच्या शोधासाठी पाठवण्यात आले, परंतु त्‍या विमानालाही UFO चा कोणताही सुगावा लागला नाही.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT