Latest

Rohit Sharma Bowled : 4 धावांवर बोल्ड होऊनही रोहित शर्माने नोंदवली विशेष कामगिरी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma Clean Bowled : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात विश्वचषकातील 33 वा सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने चौकार मारला पण तो दिलशान मधुशंकाच्या पुढच्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. मधुशंकाचा हा चेंडू मिडल स्टंपच्या लाईनवर पडला. रोहितने क्रीजमध्ये उभे राहून खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला वाटले हा चेंडू इनस्विंगर आहे पण चेंडूने हिटमॅनच्या ऑफ स्टंपचा वेध घेतला.

अशाप्रकारे भारतीय कर्णधार रोहित शर्माची खेळी अवघ्या दोन चेंडूत संपुष्टात आली. रोहितने या विश्वचषकात चौकार मारून विशेष स्थान मिळवले. स्पर्धेत 400 धावा करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला पण पुढच्या चेंडूवर त्याला तंबूत परतावे लागले. मधुशंकाने रोहितला बाद करण्याची ही दुसरी वेळ आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यासाठी भारतीय कर्णधाराची पत्नी रितिकाही स्टेडियममध्ये होती. मात्र रोहित क्लीन बोल्ड होताच तिचा यावर विश्वास बसेना आणि ती स्तब्ध होऊन पाहतच राहिली. (Rohit Sharma Clean Bowled)

वानखेडे स्टेडियमवर रोहितचे एकदिवसीय सामन्यातील रेकॉर्ड खराब आहे. हा त्याचा येथील चौथा एकदिवसीय सामना होता आणि आतापर्यंत तो केवळ 50 धावा करू शकला आहे, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 20 धावा आहे. डाव्या हाताच्या गोलंदाजांनी रोहितला नेहमीच त्रास दिला आहे. रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये 34 वेळा डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा बळी ठरला आहे. मात्र, यादरम्यान त्याने 1617 धावाही केल्या आहेत. यामध्ये हिटमॅनने 179 चौकार आणि 44 षटकार ठोकले आहेत. डावखु-या वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेटही 88 राहिला आहे. (Rohit Sharma Clean Bowled)

या विश्वचषकातही रोहितने मिचेल स्टार्क, शाहीन शाह आफ्रिदी आणि ट्रेंट बोल्ट यासारख्या दिग्गज डावखु-या गोलंदाजांचे आव्हान पार केले होते. पण वानखेडेवर मधुशंका विरुद्ध रोहित अपयशी ठरला. (Rohit Sharma Clean Bowled)

SCROLL FOR NEXT