Latest

Virat Kohli : मोहालीच्या मैदानात विराटला मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी विराट कोहलीसाठी (Virat Kohli 100th test) खास आहे. भारताच्या माजी कर्णधाराचा हा 100 वा कसोटी सामना आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी भारतीय संघ मैदानात क्षेत्ररक्षणासाठी उतरला तेव्हा कोहलीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

यादरम्यान विराटची मस्त स्टाइलही पाहायला मिळाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टी-ब्रेकच्या आधी भारताने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. श्रीलंकेला रोखण्यासाठी भारतीय क्षेत्ररक्षक मैदानात उतरणार त्याआधीच खेळाडू हात वर करून एकमेकांसमोर उभे राहिले. कोहली तिथून पळत सुटला आणि मग मागे वळून कर्णधार रोहितला मिठी मारली. त्यावेळी मैदानातील वातावरण पाहण्यासारखे होते.

काल सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीचा सन्मान करण्यात आला होता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मैदानावर सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी 100व्या कसोटी निमित्त एक खास कॅप प्रदान केली. यावेळी कोहलीचे कौतुक करताना द्रविड म्हणाले की, 'तू या सन्मानाला पात्र आहेस. तू ते कष्टाने कमावले आहेस. तुझ्या यशासाठी तुला शुभेच्छा. तुझी कामगिरी दुप्पट करत रहा.'

यानंतर विराट कोहलीनेही प्रशिक्षक द्रविड यांचे आभार मानले. कोहली म्हणाला, 'धन्यवाद राहुल भाई. हा माझ्यासाठी खूप खास क्षण आहे. माझी पत्नी अनुष्का इथे माझ्यासोबत आहे. माझा भाऊ, माझा बालपणीचा प्रशिक्षक स्टँडमध्ये आहेत. माझ्या सहकाऱ्यांचेन बीसीसीआयचे आभार मानतो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते.'

भारताचा पहिला डाव 574 धावांवर घोषित

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी टी-ब्रेकपूर्वी भारताने आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद 175 धावा केल्या तर श्रीलंकेकडून सुरंगा लखमल, विश्वा फर्नांडो आणि लसिथ एम्बुल्डेनिया यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT