Latest

India vs Sri Lanka Test Day 2 : श्रीलंकेला पहिला धक्का, लहिरु थिरिमने बाद

नंदू लटके

 पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४६ डोंगर आहे. बुमराहने श्रीलंकेला पहिला धक्का दिला आहे. लहिरू थिरिमनेला जसप्रित बुमराहने पायचित केले आहे. तर कुसल मेंडीस आणि दिमुथ करूणारत्ने क्रिजवर टिकून आहेत. श्रीलंकेच्या पहिल्या डावातही बुमराहने पाच विकेट्स पटकावल्या होत्या. या डावामध्ये बुमराह किती विकेट्स पटकावतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भारताने दुसरा डाव घोषित केला आहे. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीने भारताला ४४६ धावांची आघाडी मिळाली आहे. श्रेयस अय्यरने ८७ चेंडूमध्ये ६७ धावांची खेळी केली आहे. ऋषभ पंतने भारताकडून सर्वांत जलदगतीने कसोटीतील अर्धशतका झळकावले आहे. श्रीलंकेसमोर विजयासाठी ४४६ धावांचा डोंगर आहे.

ऋषभ पंत पाठोपाठ श्रेयस अय्यरनेही अर्धशतक झळकवले आहे. श्रेयस अय्यरने ६९ चेंडूंमध्ये ५२ धावांची खेळी केली आहे. पहिल्या डावातही श्रेयस अय्यर ने पहिल्या डावातही ९२ धावांची दमदार खेळी केली होती. श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीने भारताने ३८५ धावांची आघाडी घेतली आहे.

भारताने दुसऱ्या डावात 'डिनर ब्रेक'पर्यंत ३४२ धावांची मजबूत आघाडी घेतली होती. रविंद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर क्रिजवर आहेत. दमदार अर्धशतक झळकावल्‍यानंतर ऋषभ पंत बाद झाला.   विराट कोहली  १६ चेंडूमध्ये १३ धावा करत माघारी परतला. त्‍याला प्रवीण जयविक्रमा याने पायचीत केले. यानंतर ऋषभ पंतने दमदार फलंदाजी करत २८ चेंडूत अर्धशतक झळकवले. भारताने ३४२ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.  श्रेयस अय्‍यर हा १७ खेळत आहे. पहिल्‍या डावात ९२ धावांची खेळी केली हाेती. आता दुसर्‍या डावातही त्‍याच्‍याकडून दमदार खेळीची चाहत्‍यांना अपेक्षा आहे. दुसर्‍या कसाेटीत भारताला मजबूत अशी ३४२ धावांची आघाडी केली आहे.

बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकामध्‍ये दुसर्‍या कसोटी सामन्‍यातील दुसर्‍या दिवशी भारताची दमदार सुरुवात झाली. ( India vs Sri Lanka Test Day 2) भारताने श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावांमध्‍येच गुंडाळला. यानंतर आपल्‍या दुसर्‍या डावात सावध सुरुवात केली. मयांक अग्रवाल ३४ चेंडूंमध्ये २२ धावा करीत माघारी परतला. यानंतर  रोहीत शर्मा आणि हनुमा विहारीने डावाला आकार दिला. राेहित शर्माचे अर्धशतक हुकले. ताे ४६ धावांवर बाद झाला

 भारताचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह याने ५ बळी घेतले. बुमराह याने कसोटी क्रिकेटमध्‍ये प्रथम पाच विकेट घेतल्‍या आहेत. त्‍याने १० षटकामंध्‍ये २४ धावा देत ही कामगिरी केली.

India vs Sri Lanka Test Day 2: पहिल्‍या दिवशी फिरकीला साथ

बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी पहिल्या सत्रापासूनच फिरकीला साथ देऊ लागल्याने या खेळपट्टीवर फलंदाज चाचपडत आहेत. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी अचूक गोलंदाजी करताना भारताला 252 धावांत रोखल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा न उचलला तर नवलच. भारताला प्रत्युत्तर देणार्‍या श्रीलंकेचा डाव 6 बाद 86 असा अडचणीत आला आहे. लंकेचा संघ अजून पहिल्या डावात 166 धावांनी पिछाडीवर आहे.
पहिल्या सत्रापासूनच खेळपट्टीवर चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर माती उडत होती; पण या गंभीर परिस्थितीतही श्रेयस अय्यर खंबीर उभा राहिला आणि दमदार खेळ करताना भारताचा डाव सावरला; पण दुसर्‍या बाजूने त्याला साथ देण्यासाठी कोणीही तग धरला नाही. शेवटी तो शतक पूर्ण करण्यासाठी जलदगतीने खेळत असताना 92 धावांवर बाद झाला. भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित व मयंक यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देणे अपेक्षित होते; परंतु तसे घडले नाही. दुसर्‍याच षटकात मयंक धावचीत झाला. त्यापाठोपाठ रोहितही 15 धावा करून माघारी परतला. विराट व हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करताना तिसर्‍या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी केली; परंतु प्रवीण जयविक्रमा याच्या सुरेख फिरकीने विहारीची विकेट घेतली. विहारी 31 धावांवर बाद झाला. धनंजय डिसिल्वाच्या गोलंदाजीवर विराट (23) बाद झाला.

ऋषभ पंतने फटकेबाजी करून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दडपण आणले. त्याचा एक झेलही सोडला गेला; पण चेंडूची उसळी ओळखण्यात तोही अपयशी ठरला अन् भारताला मोठा धक्का बसला. 26 चेंडूंत 7 चौकारांसह 39 धावा करणारा ऋषभ त्रिफळाचीत झाला. लसिथ एम्बुल्देनियाच्या चेंडूवर कट मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. रवींद्र जडेजाही फार काळ खेळपट्टीवर टिकला नाही आणि एम्बुल्देनियाने त्यालाही 4 धावांवर बाद केले. श्रेयस अय्यर स्टार ठरला. मुंबईचा खडूसपणा येथे दाखविताना त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने गगनचुंबी षटकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. श्रेयसने भारताला 200 पार नेले. 82 धावांवर श्रेयसचा सीमारेषेवर झेल सुटला. त्यानंतर त्याने आणखी एक खणखणीत षटकार खेचला. 91 धावांवर त्याला रन आऊट करण्याची संधी गमावली; पण पुढच्या षटकात जयविक्रमाने भारताचा डाव गुंडाळला. श्रेयस 98 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकारांसह 92 धावांवर यष्टिचीत झाला. भारताचा पहिला डाव 252 धावांवर गडगडला.

श्रीलंकेकडून एम्बुल्देनिया आणि जयविक्रमाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. भारताला रोखल्यानंतर श्रीलंकन फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती; परंतु भारतीय मार्‍यापुढे त्यांनी लगेचच नांगी टाकायला सुरुवात केली. डावाच्या तिसर्‍या षटकात जसप्रीत बुमराहने कुशल मेंडीसला (2) बाद केले. यानंतर थिरिमाने (8), करुणारत्ने (4), धनंजय डिसिल्व्हा (8) आणि चरिथ असलंका (5) हे पाचजण पन्नाशीतच तंबूत परतले. अँजेलो मॅथ्युजने आपला सर्व अनुभव पणाला लावत एक बाजू लावून धरली होती; पण दिवसाचा खेळ संपता संपता बुमराहने त्यालाही बाद करून श्रीलंकेच्या अडचणीत भर टाकली. खेळ संपला तेव्हा निरोशन डिकवेला (13) आणि लसिथ एम्बुल्देनिया (0) हे खेळपट्टीवर नाबाद आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT