Latest

ICC World Cup Prize : वर्ल्डकप जिंकणा-या संघाला किती पैसे मिळणार? जाणून घ्या आकडेवारी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC World Cup Prize : आयसीसी वनडे वर्ल्डकप ही क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा आहे. ही स्पर्धा दर 4 वर्षांनी एकदा खेळवली जाते. सध्या ही स्पर्धा भारतात खेळवली जात असून शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. विजेतेपदाच्या शर्यतीत भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे 4 संघ उरले आहेत. दरम्यन, ICC ने बाद फेरीचे सामने सुरु होण्यापूर्वी बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. यावेळी स्पर्धेसाठी एकूण 10 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 82.93 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम ठेवली आहे.

जेतेपद जिंकणारा संघ मालामाल (ICC World Cup Prize)

विश्वचषक 2023 चे उपांत्य फेरीचे सामने 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी खेळवले जातील. पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. त्याचवेळी दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने येतील. हे सामने जिंकणारे संघ 19 नोव्हेंबरला विजेतेपदासाठी लढतील. स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला 4 मिलियन डॉलर्स अर्थात सुमारे 33 कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर अंतिम फेरीतील विजेत्या संघासोबतच पराभूत संघालाही कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. पराभूत संघाला दोन मिलियन डॉलरचे बक्षीस दिले जाईल.

उपविजेत्यावरही पैशांचा वर्षाव (ICC World Cup Prize)

वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमसोबतच उपविजेत्या आणि गटातून बाहेर पडणाऱ्या संघांवरही पैशांचा वर्षाव केला जाणार आहे. आयसीसीच्या माहितीनुसार, वनडे वर्ल्डकप विजेत्याला 40 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 33.18 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे. याशिवाय अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या टीमला 2 दशलक्ष डॉलर म्हणजेच 16.59 कोटी रुपये मिळतील. वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुप स्टेजमधील सामने जिंकण्यासाठी बक्षीस रक्कमही देण्यात आली. यावेळी प्रत्येक विजयासाठी टीमला 40 हजार डॉलर म्हणजेच 33.17 लाख रुपये मिळाले. वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुप स्टेजमधील सामने जिंकण्यासाठी बक्षीस रक्कमही देण्यात आले. यावेळी प्रत्येक विजयासाठी टीमला 40 हजार यूएस डॉलर म्हणजेच 33.17 लाख रुपये मिळाले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT