Latest

India vs England 5th Test | पहिल्या दिवसा अखेर भारत 1 बाद 135

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून धर्मशाला येथे सुरू आहे. सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 218 धावांवर संपुष्टात आला.  फलंदाजी करताना इंग्लंकडून झॅक क्रॉलीने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडा गाठता आला नाही. भारताकडून कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने 100 वी कसोटी सामन्यात चार विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. म्हणजे इंग्लंडच्या सर्व 10 विकेट  फिरकीपटूंनी घेतल्या. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी फलंदाजीसाठी मैदानावर उतरली आहे.

भारताची फलंदाजी

पहिल्या दिवसा अखेर भारत 1 बाद 135

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पहिल्या डावात 1 गडी गमावून 135 धावा केल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. यानुसार भारत अजूनही इंग्लंडपेक्षा 83 धावांनी मागे आहे. कर्णधार रोहित शर्मा 52 धावांवर नाबाद असून शुभमन गिल 26 धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये 31 धावांची भागीदारी झाली आहे. भारतीय संघाला एकमेव धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. 58 चेंडूत 57 धावा करून तो बाद झाला. शोएब बशीरने त्याला यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी यष्टिचित केले.

रोहित शर्माचे अर्धशतक

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने 77 बॉलमध्ये आपले अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले.

भारताला पहिला धक्का; जैस्वाल बाद

सामन्याच्या 21 व्या ओव्हरमध्ये जैस्वालच्या रूपात भारताचा पहिला फलंदाज बाद झाला. त्याला इंग्लंडचा गोलंदाज शोएब बशिरने फोक्सकरवी झेलबाद केले. जैस्वालने आपल्या खेळीत 58 बॉलमध्ये 57 धावांची खेळी केली. रोहित – जैस्वाल जोडीने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागिदारी केली.

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी फलंदाजीसाठी मैदानावर उतरली आहे. भारतीय संघाने डावाच्या  19 ओव्हरमध्ये बिनबाद 90 धावा केल्या आहेत. यामध्ये रोहितने 43 तर यशस्वीने 47 धावा केल्या आहेत. यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी रचली आहे.

इंग्लंडची फलंदाजी

भारतीय फिरकीची कमाल; इंग्लंडचा डाव 218 धावांवर ओटोपला

सामन्याच्या 58 व्या षटकात बेन फोक्सच्या रूपात इंग्लंडला नववा धक्का बसला. त्याला फिरकीपटू अश्विनने बाद केले. फोक्सने आपल्या खेळीत 42 बॉलमध्ये 24 धावांची खेळी केली. यानंतर त्याच ओव्हरच्या चौथ्या बॉलवर जेम्स अॅन्डरसनला पडीकलकरवी 0 धावांवर बाद करत इंग्लंडचा डाव 218 धावांवर संपुष्टात आणला.

इंग्लंडला नववा धक्का; बेन फोक्स बाद

सामन्याच्या 58 व्या षटकात बेन फोक्सच्या रूपात इंग्लंडला नववा धक्का बसला. त्याला फिरकीपटू अश्विनने बाद केले. फोक्सने आपल्या खेळीत 42 बॉलमध्ये 24 धावांची खेळी केली.

टी- ब्रेकपर्यंत इंग्लंड 8 बाद 194

चहापानापर्यंत इंग्लंडने आठ गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. सध्या बेन फॉक्स आठ धावा करून क्रीजवर असून शोएब बशीरने पाच धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात इंग्लंडने दोन गडी गमावून 100 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सत्रात इंग्लिश संघाने 29.3 षटकांत सहा गडी गमावून 94 धावा केल्या. कुलदीपने पाच विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी अश्विनला दोन विकेट मिळाल्या. जडेजाने एक विकेट घेतली आहे.

अश्विनचा इंग्लंडला पाठोपाठ धक्का; हार्टले – वुड माघारी

रविचंद्रन अश्विनने आपल्या 100व्या कसोटीत एकाच षटकात दोन विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या डावाच्या 50 व्या षटकात टॉम हार्टले आणि मार्क वुडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्टलीला सहा धावा करता आल्या, तर वुडला खातेही उघडता आले नाही. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अश्विनने हार्टलीला पडिक्कलकरवी झेलबाद केले, तर चौथ्या चेंडूवर वुडला रोहितने स्लिपमध्ये झेलबाद केले. सध्या शोएब बशीर आणि बेन फॉक्स क्रीजवर आहेत.

कुलदीपने घेतली इंग्लंडची 'फिरकी'; निम्मा संघ तंबूत धाडला

सामन्याच्या 46 व्या षटकात बेन स्टोक्सच्या रूपात इंग्लंडला सहावा धक्का बसला. त्याला भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने एलबीब्ल्यू केले. स्टोक्सने 6 बॉल खेळले. यामध्ये त्याला खातेही उघडता आले नाही.

जडेजाने रुटला तंबूत धाडले, १७५ धावांवर इंग्‍लंडचा निम्‍मा संघ तंबूत

४५ व्‍या षटकात रवींद्र जडेजा याने २६ धावांवर खेळार्‍या रुटला त्‍याने पायचीत केले. १७५ धावांवर इंग्‍लंडला पाचवा धक्‍का बसला.

कुलदीपच्‍या विकेटचा 'चाैकार'! 175 धावांवर इंग्‍लंडला चाैथा धक्का

कुलदीपने ४४ व्‍या षटकात २९ धावांवर खेळणार्‍या बेअरस्‍टोला यष्‍टीरक्षक ध्रुवकरवी झेलबाद केले. कुलदीपने सलग चार विकेट घेतल्‍या आहेत.

इंग्लंडला मोठा धक्का; झॅक क्रॉली 79 धावाकरून माघारी

सामन्याच्या 38 व्या ओव्हरमध्ये झॅक क्रॉलीच्या रूपात मोठा धक्का बसला. झॅकला भारताचा फिरकीपटू कुलदीपने क्लीन बोल्ड केले. झॅकने आपल्या खेळीत 108 बॉलमध्ये 79 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 1 षटकार लगावला.

लंचपर्यत इंग्लंड 2 बाद 100; झॅक क्रोलीचे अर्धशतक

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना धर्मशाला येथे खेळवण्यात येत आहे. सामन्यात लंचपर्यंत फलंदाजी करताना इंग्लंडने 2 विकेट गमावून 100 धावा केल्या आहेत. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. कुलदीपने ही भागीदारी फोडत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डकेटला 27 धावांवर शुभमन गिलकरवी झेलबाद केले. यानंतर क्रॉलीने कसोटी कारकिर्दीतील 14वे अर्धशतक आणि भारताविरुद्ध पाचवे अर्धशतक झळकावले. यानंतर कुलदीपने ओली पोपला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी यष्टिचित करून इंग्लिश संघाला आणखी एक धक्का दिला. पोपने 11 धावा केल्या. सध्या क्राऊली ६१ धावांवर नाबाद आहे.

इंग्लंडला दुसरा धक्का; ओली पोप बाद

सामन्याच्या 26 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडला दुसरा धक्का बसला. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने ध्रुव जुरेलकरवी ओली पोपला बाद केले. ओलीने आपल्या खेळीत 24 बॉलमध्ये 11 धावांची खेळी केली.

जॅक क्रॉलीचे अर्धशतक

जॅक क्रॉलीने 64 चेंडूत कसोटी कारकिर्दीतील 14 वे अर्धशतक झळकावले. भारताविरुद्ध कसोटीतील हे त्याचे पाचवे अर्धशतक आहे. इंग्लंडने एका विकेटच्या गमावून 39 धावा केल्या आहेत. सध्या जॅक क्रोली 52 धावांवर आणि ओली पोप 10 धावांवर फलंदाजी करत आहे.

इंग्‍लंडला ६४ धावांवर पहिला धक्‍का

इंग्लंडला पहिला धक्का 64 धावांवर बसला. कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात डकेटचा शुभमन गिलने अप्रतिम झेल घेतला.

देवदत्त पडिक्कलचे कसोटीत पदार्पण….

बुधवारी ६ मार्च टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान रजत पाटीदारच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. यामुळे तो पाचव्या कसोटीसाठी खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देवदत्त पडिक्कल आजच्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून पदार्पण करत आहे. (India vs England 5th Test)

टीम इंडियाची Playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्ता पडिक्कल, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रूव जुरेल (यष्टिरक्षक), आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT