पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात होणार्या T20 विश्वचषक स्पर्धेला काही दिवस राहिले आहे. यापूर्वी टीम इंडियाच्या जर्सीबाबत मोठा अपडेट 'एमपीएल'ने दिली आहे. ( India T20 WC Jersey ) ही नवी जर्सी भारतीय क्रिकेट चाहत्यांना पसंतीस उतरेल, असा विश्वासही जर्सी तयार करणार्या 'एमपीएल' कंपनीने व्यक्त केला आहे.
सोमवारी (दि. १२) सायंकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संघात केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चेहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे.
जर्सी बनविणार्या एमपीएल स्पोर्ट्स टीम इंडियाच्या नव्या जर्सीबाबत माहिती दिली आहे. क्रिकेट चाहत्यांशिवाय खेळाला मज्जा नाही. टीम इंडियाबरोबर तुम्ही फॅन्स मोंमेट तुम्ही शेअर करा, असे ट्विट कंपनीने केले आहे. एमपीएलने एक व्हिडिओही शेअर केला असून यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि फलंदाज श्रेयस अय्यर हे चाहत्यांनी ड्रिम जर्सीचा हिस्सा होण्याचे आवाहन करत आहेत.
सध्या टीम इंडियाची जर्सी ही गदड निळ्या रंगाची आहे. मात्र एमपीएलने केलेल्या ट्विटमध्ये असा अंदाज व्यक्त होत आहे की, आता टीम इंडियाची जर्सीचा रंग बदलणार असून तो फिकट निळा होण्याची शक्यता आहे.