Latest

Agni Prime Missile : अग्नी प्राइम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने शुक्रवारी अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची (Agni Prime Missile) यशस्वी चाचणी घेतली. आण्विक क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 1000 ते 2000 किमी आहे. हे क्षेपणास्त्र सकाळी 9.45 वाजता ओडिशाच्या किनारपट्टीवरून डागण्यात आले. त्यानंतर या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात अचूकतेने लक्ष्यावर मारा करताना सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. एएनआय वृत्तसंस्थेने संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, क्षेपणास्त्राने चाचणी उड्डाणादरम्यान कमाल पल्ला गाठला. या चाचणीदरम्यान क्षेपणास्त्राने सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण केली. अग्नी प्राइम क्षेपणास्त्राची ही तिसरी यशस्वी चाचणी असून अचूकता आणि विश्वासार्हता स्थापित केली आहे. यापूर्वी जून 2022 आणि डिसेंबर 2021 मध्ये याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. (Agni Prime Missile)

अग्नी प्राइम क्षेपणास्त्र हे अग्नी क्षेपणास्त्रांच्या (Agni Prime Missile) मालिकेतील नवीन पिढीचे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) बनवले आहे. अग्नी मालिकेतील इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेत अग्नी प्राइम क्षेपणास्त्र सर्वात लहान आणि वजनाने हलके आहे. हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT