Latest

Airbus C295 विमानाचे स्पेनमध्ये यशस्वी उड्डाण, भारतीय हवाई दलाची वाढणार ताकद

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतासाठी बनवलेल्या एअरबस सी295 विमानाने पहिले उड्डाण केले आहे. एअरबस डिफेन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्याची माहिती दिली आहे. एअरबसने ट्‌विटमध्ये लिहिले की, भारतासाठी बनवलेल्या एअरबस सी295 ने आपले पहिले उड्डाण यशस्वीपणे केले. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस ही विमाने भारतात पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

C295 हे लष्करी वाहतूक विमान आहे. मेक इन इंडिया एरोस्पेस कार्यक्रमासाठी C295 चे पहिले यशस्वी उड्डाण महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे. हा कार्यक्रम भारतीय वायुसेना (IAF) ऑपरेशनल सुधारण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे आणि क्षमतेचे उदाहरण आहे. भारतीय वायुसेना C295 चे जगातील सर्वात मोठे ऑपरेटर बनणार आहे. त्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकदही अनेक पटींनी वाढणार आहे, असे एअरबस डिफेन्स अँड स्पेसमधील मिलिटरी एअर सिस्टिमचे प्रमुख जीन ब्राइस ड्युमॉन्ट यांनी म्हटले.

भारत आणि अमेरिकन संरक्षण कंपनी एअरबस यांच्यातील करारानुसार, सप्टेंबर 2023 ते ऑगस्ट 2025 दरम्यान 16 C295 विमानांचा पुरवठा केला जाईल. त्यानुसार, ही 16 विमाने स्पेनमधील सेव्हिल येथे असेंबल करून 'फ्लाय-अवे' स्थितीत दिली जातील. उर्वरित 40 विमाने दोन्ही कंपन्यांमधील औद्योगिक भागीदारीचा भाग म्हणून टाटा ऍडव्हान्स सिस्टम्स लिमिटेड (TASL) भारतात तयार आणि असेंबल केली जातील.

इतर मालवाहू विमानांप्रमाणे यात चार किंवा पाच कर्मचारी नसतात. फक्त 2 लोक या विमानाचे उड्डाण करतात. 73 सैनिक, 48 पॅराट्रूपर्स किंवा 12 स्ट्रेचर आत नेले जाऊ शकतात. हे विमान मध्यम आकाराचे असल्याने याचे लहान धावपट्टीवर लँडिंग करता येते तसेच टेकऑफही करण्यात कसलीच अडचण येत नाही. जास्तीत जास्त 9250 किलो वजन उचलून ते उडू शकते. हलक्या आणि मध्यम विभागातील या नवीन पिढीतील विमाने भारताची लष्करी ताकद वाढवून चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी ठरणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT