Latest

देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार! २४ तासांत ३० हजार नवे रुग्ण, ५१४ जणांचा मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३०,६१५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५१४ जणांचा मृत्यू झाला आहे. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या ११ टक्क्यांनी अधिक आहे. दिवसभरात ८२ हजार ९८८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ७० हजार २४० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.४५ टक्क्यांवर आला आहे.

गेल्या आठवड्याभरात देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने घट झाली होती. पण गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली आहे. याआधीच्या दिवशी देशात २७ हजार ४०९ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ३४७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान ८२ हजार ८१७ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. गेल्या रविवारी ४४ हजार ८७७ कोरोनाबाधित आढळले होते, तर ६८४ रूग्णांचा मृत्यू झाला होता.

मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.८२ टक्क्यांवर पोहचला होता. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर २.२३ आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ३.६३ टक्क्यांवर पोहचला होता.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७३ कोटी ८६ लाख डोस देण्यात आले आहेत. यातील ४४.६८ लाख डोस सोमवारी दिवसभरात देण्यात आले. खबरदारी म्हणून आतापर्यंत १.७६ कोटी बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १७१ कोटी ३५ लाख ६१ हजार ४२० डोस पैकी १२ कोटी १४ लाख ६४ हजार १३६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ७५ कोटी ३० लाख ३३ हजार ३०२ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील १२ लाख २९ हजार ५३६ तपासण्या सोमवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

कोर्बेवॅक्स लस सुरक्षित असल्याचा निष्कर्ष

कोरोना नियंत्रणासाठी देशात विकसित करण्यात आलेली कोर्बेवॅक्स लस सुरक्षित असल्याचा निष्कर्ष नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनच्या (एनटीएजीआय) वर्किंग ग्रुपने काढला आहे. इम्युनिटी तसेच जास्त अँटीबडी विकसित होण्याच्या दृष्टीने ही लस सुरक्षित असल्याचे वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मेक्सिकोत एका दिवसात ६४३ जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियात कोरोनाचा धोका कायम आहे. येथे एका दिवसात ९०,४४३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सिंगापूरमध्ये एका दिवसात १९,१७९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मेक्सिकोत २१,२०७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे येथील मृतांचा एकूण आकडा ३ लाख १३ हजार ६०८ वर पोहोचला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT