Latest

देशात कोरोनाचा घटता आलेख कायम; दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट सुद्धा पावणे दोन टक्क्यांच्या खाली !

backup backup

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात कोरोना संकट दूर होऊ लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अलीकडील काळात प्रथमच गेल्या २४ तासात प्रथमच कोरोना बाधितांचा आकडा २० हजारांच्या खाली आला आहे. देशात गेल्या २४ तासात १९ हजार ९६८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ४८ हजार ८४७ हजार जणांनी कोरोनावर मात केली.

देशात गेल्या २४ तासात ६७३ जणांना कोरोनाने प्राण गमवावा लागला. देशात सध्या २ लाख २४ हजार १८७ कोरोना ॲक्टीव्ह केसेस आहेत. दैनंदिन कोरोनाबाधितांचा दरही पावणे दोन टक्क्यांच्या खाली आला असून तो आता १.६८ टक्के आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २० लाख ८६ हजार ३८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील आजवरचा मृत्यूचा आकडा पाच लाखांच्या पार गेला असून तो आता ५ लाख ११ हजार ९०३ झाला आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १७५ कोटी ३७ लाख २२ हजार ६९७ डोस वितरित करण्यात आले आहेत. देशात शनिवारपर्यंत ७५ कोटी ८१ लाख २७ हजार ४८० कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT