Latest

तिसऱ्या लाटेतील निच्चांकी रुग्णसंख्या, २४ तासांत कोरोनाचे १६ हजार नवे रुग्ण, २०६ मृत्यू

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६ हजार ५१ नवे रुग्ण आढळून आले. तर २०६ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांतील ही रुग्णसंख्या या वर्षातील निच्चांकी आहे. सध्या देशात २ लाख २ हजार १३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १.९३ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत १७५ कोटी ४६ लाख २५ हजार डोस देण्यात आले आहेत. याआधीच्या दिवशीही कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांच्या खाली आला होता. शनिवारी एका दिवसात १९ हजार ९६८ जणांना कोरोनाची लागण झाली होती, तर ४८ हजार ८४७ हजार जणांनी कोरोनावर मात केली होती. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाची रुग्णसंख्या २० हजारांच्या खाली आली आहे.

उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. यामुळे राज्य सरकारने कोरोनाशी संबंधित निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. योगी सरकारने नाईट कर्फ्यू रद्द केला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा धोका झाला कमी

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात २७ डिसेंबर २०२१ पासून कोरोनाचा संसर्ग वाढला होता. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचा प्रभाव, रोग प्रतिकारकशक्ती वाढल्याने आता कोरोनाचा धोका कमी झाला आहे. २७ डिसेंबर २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२२ या ५३ दिवसांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ६१ हजार ५६७ कोरोनाबाधित आढळून आलेत. याच कालावधीत १३४ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाने पर्यटकांसाठी सीमा पुन्हा खुल्या केल्या

ऑस्ट्रेलियात कोरोनाचा धोका कमी झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाने बंद केलेल्या सीमा पुन्हा खुल्या केल्या आहेत. यामुळे पर्यटकांचे येणे सुरु झाले आहे. मेक्सिकोत आणखी १६३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे येथील मृतांचा एकू आकडा ३ लाख १५ हजार ६८८ वर पोहोचला आहे. मेक्सिकोतील मृतांचा आकडा चिंताजनक आहे.

SCROLL FOR NEXT