Latest

India-Pakistan Lesbian Couple : मी तिला धोका दिलाय; भारत-पाकिस्तानच्या लेस्बियन कपलचे लग्नाआधीच ब्रेकअप

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एखाद्या परिकथेप्रमाणे असणारे समलैंगिक लेस्बियन नाते लग्नाच्या काही आठवड्याआधीच संपुष्टात आलं आहे. भारत-पाकिस्तान समलैंगिक लेस्बियन कपलने लग्नाच्या काही आठवड्याआधी ब्रेकअप केलं आहे. (India-Pakistan Lesbian Couple)
भारताची अंजली चक्र आणि पाकिस्तानची सूफी मलिकने आपले नाते संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. आपले आगामी लग्न रद्द केल्याचे त्यांनी म्हटले आहे. सूफी मलिक – अंजली चक्र २०१९ मध्ये शानदार कपल फोटोशूटसाठी इंटरनेटवर व्हायरल झाले होते. आता दोघांनी इन्स्टाग्रामवर आपण वेगळे होत असल्याची माहिती शेअर केली आहे. या मागचे कारण सूफीने धोका दिल्याचे म्हटले गेले आहे. (India-Pakistan Lesbian Couple)

असा सुरु झाला होता प्रवास

अंजली आणि सूफीची एकत्र यात्रा ५ वर्षापूर्वी सुरू झाली होती. त्यांचा साखरपुडा एक वर्षापूर्वी झाला होता. एखाद्या परीकथे प्रमाणे त्यांचे आयुष्य होतं. सूफीने न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित एम्पायर स्टेट बिल्डिंगमध्ये अंजलीला प्रपोज केलं. या क्षणांना तिने एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून शेअर करत आनंद व्यक्त केला होता.

आता त्यांचे स्वप्न अचानक तुटले. सूफीने लग्नाच्या काही आठवड्याआधी अंजलीला धोका दिल्याचे स्वीकारले. सूफीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, "मैं अपने कार्यों के माध्यम से सबसे ज्यादा प्यार और परवाह करती हूं, जिसमें हमारा परिवार और दोस्त, हमारा समुदाय शामिल है, जिसे मैं संजोती हूं." मी माझ्या लग्नाच्या काही आठवड्याआधी तिला धोका देऊन विश्वासघाताची एक अविश्वसनीय चूक केला. मी तिला खूप दु:ख दिलं आहे. हे माझ्या समजण्यापलिकडे आहे. मी माझी चुकी स्वीकार करते आणि हे मी पुढेही जारी ठेवेन. मी लोकांना खूप दु:ख पोहोचवलं आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT