Latest

WT20WC SemiFinal : सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाचा ५ धावांनी विजय

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी -२० विश्वचषक जिंकण्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाचे स्वप्न एकदा भंगले आहे. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पाच धावांनी पराभूत केले. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने चार विकेट गमावून 172 धावा केल्या. टीम इंडियाने मेग लॅनिंग आणि बेथ मुनी यांचा सहज झेल सोडला. परिणामी, मुनी आणि लॅनिंगने मोठे डाव खेळले. मुनीने 37 चेंडूत 54 धावा केल्या. या व्यतिरिक्त लॅनिंगने 34 चेंडूंमध्ये नाबाद 49 धावा केल्या. गार्डनरने धडाकेबाज खेळी करत 18 चेंडूत 31 धावा केल्या.

भारताने 14 षटकांत चार विकेट गमावत 124 धावा केल्या होत्या. यावेळी टीम इंडियाला 36 बॉलमध्ये 49 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी टीम इंडिया सामना सहजपणे सामना असे चित्र होते. हरमनप्रीत बाद होताच, पुढच्या षटकात रिचलाही खराब शॉट खेळून बाद झाली. पाठोपाठ स्नेह राणा बाद झाल्यावर सामना भारताच्या हातातून निसटू लागला. शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा जिंकण्यासाठी आवश्यक होत्या. परंतु भारताचा डाव 167 धावांवर आटोपला. यामुळे सामन्यात भारताचा 5 धावांनी पराभव झाला. हर्मनप्रीत व्यतिरिक्त, जेमिमाने 24 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या. शेफली वर्मा, स्मृति मंधन आणि भाटिया यासारखे भारतीय तारे सामन्यात अयशस्वी ठरले

SCROLL FOR NEXT