Latest

India-Japan : चिनी आव्हानाचा सामना करण्याविषयी मोदी-किशिदा यांच्यात द्विपक्षीय चर्चा

backup backup

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा India-Japan :जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चीनच्या आव्हानांचा सामना करण्यासोबतच सोमवारी द्विपक्षीय सहकार्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. क्रिटिकल टेक्नॉलॉजी, डिजिटल या क्षेत्रासह मालवाहतूक, अन्नप्रक्रिया, पोलाद याचसोबत 'एमएसएमर्ई'च्या अनुषंगाने चर्चा झाली.

हैदराबाद भवनातील या चर्चेच्या दरम्यान जपानचे पंतप्रधान किशिदा यांनी मेमध्ये होत असलेल्या जी-7 च्या बैठकीचे निमंत्रण दिले. ते मोदींनी स्वीकारले. भारत-जपान यांच्यात संरक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि उच्च तंत्रज्ञान, हरित ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणे हा या भेटीचा उद्देश होता. जी-20 आणि जी-7 या बैठकीतील प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.

India-Japan :चिनी आव्हानावर चर्चा

हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर क्षेत्रात चीन आपली ताकद वाढवत आहे. त्यामुळे भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया आघाडी बनवून चिनी कारवायांचा मुकाबला करण्याची योजना आखली आहे. लद्दाख आणि अरुणाचल प्रदेशच्या 'एलएसी'वर चीन हक्क गाजवत असतो. त्याचप्रमाणे सेनकाकू बेटावर देखील चिनी कारवाया सुरू असतात. त्यामुळे जपान-चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. या अनुषंगाने दोन्ही देशांत एकवाक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT