Latest

India vs Sri Lanka1st Test : भारताचा दणदणीत विजय, श्रीलंकेचा डावाने पराभव

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : माेहाली कसाेटीत भारताने एक डाव आणि २२२ धावांनी भारताने श्रीलंकेचा पराभव केला आहे. पंजाब क्रिकेट असोशिएशन स्टेडिअम मध्ये सुरू असलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात ५७४ धावा केल्या. यानंतर  डाव घोषित केला. श्रीलंका पहिल्या डावात १७४ धावांपर्यंतच मजल मारू शकली. त्यानंतर भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. फॉलोऑन दिल्यानंतरही श्रीलंकेचा  दुसर्‍या डाव  १७८ धावांवर आटाेपला. (Ind Vs Sri)

भारताच्‍या पहिल्‍या डावात  रविंद्र जडेजाने २२८ चेंडूंमध्ये १७५ धावांची दमदार खेळी केली होती. ऋषभ पंतनेही ९७ धावांमध्ये ९६ धावा करत भारताचा स्कोर उभा केला. रविंद्र जडेजा द्विशतकाजवळ असतानाच भारताने आपला डाव ५७४ धावांवर घोषित केला. तर हनुमा विहारीने १२८ चेंडूंमध्ये ५८ धावांची खेळी करत अर्धशतक झळकावले हाेते. (Ind Vs Sri)

श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावात जडेजाने ४ बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विनने ३ विकेट्स घेतल्या. जडेजाच्या अचूक माऱ्यासमोर श्रीलंकन संघाने नांगी टाकली. श्रीलंकेकडून एन. डिकवेला याने ६९ चेंडूंमध्ये ४९ धावांची कामगारी केली. (Ind Vs Sri)

टी ब्रेकनंतर श्रीलंकेची पडझड

टी ब्रेकनंतर टीम इंडियाने श्रीलंकेला सलग तीन धक्‍के दिले. असलंका याला अश्‍विनने स्‍लीपमध्‍ये विराटकडे झेल देण्‍यास भाग पाडले. यानंतर एंजलो मेथ्‍यूजला जडेजाने तंबूत धाडले. तर पाठोपाठ डिसिल्‍वाचा बळी जडेजाने घेतला.

असलंकाला अश्विनने बळी घेतला. तर फुल फॉर्ममध्ये असलेल्या जडेजाने सलग दोन बळी घेतले आहेत. असलंका २० चेंडूमध्ये ९ धावा करत तंबूत परतला. तर एंजलो मॅथ्यूज ७५ चेंडूमध्ये २८ धावा करत रविंद्र जडेजाचा शिकार झाला आहे. डिसिल्वाला जडेजाने मागे धाडले आहे. डिसिल्वाने ५८ चेंडूंमध्ये ३० धावांची खेळी केली आहे.

अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या नाबाद175 धावांच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या कसोटीत वर्चस्व गाजवले असून आपला पहिला डाव 8 बाद 574 धावांवर घोषित केला. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेला बॅकफूटवर फेकले. दुसर्‍या दिवसअखेर श्रीलंकेने दिवसअखेर 4 बाद 108 धावा केल्या होत्या.

श्रीलंका दुसरा डाव

  • सामन्यतील ३३ व्या षटकांत जडेजाने डीसिल्वाला बाद करून आणखी एक दणका दिला.
  • एंजलो मैथ्‍यूजला
  • ३१ षटकांच्या खेळानंतर श्रीलंका ३ बाद ९० धावांवर खेळत आहे. श्रीलंका अजूनही ३१० धावंनी पिछाडीवर आहे.
  • श्रीलंकेने डाव सावरला
  • २५ षटकांच्या खेळानंतर श्रीलंकेने ३ बाद ७४ धावा केल्या आहेत.
  • २१ व्या षटकांनंतर श्रीलंका ३ बाद ६५ धावांवर खेळत आहे.
  • श्रीलंका अजूनही ३३५ धावांनी मागे
  • दुसऱ्या डावातील १६ व्या षटकापर्यंत श्रीलंकेला तीन धक्के बसले आहेत. श्रीलंका सध्या ३ बाद ४५ धावांसह खेळत आहे.
  • लंच ब्रेकनंतर सुरू झालेल्या खेळात अश्विनने दुसरा धक्का दिला. त्याने पाठुम निस्संकाला बाद केला.
  • फॉल ऑननंतर श्रीलंकेने फलंदाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी पहिल्या ४ षटकांमध्ये अश्विनने लंकेला पहिला दणका दिला. सध्या लंका दुसऱ्या डावात ४ षटकांमध्ये १ गडी बाद १० धावा केल्या आहेत.

India vs Sri Lanka, 1st Test भारताचे लक्ष मोठ्या आघाडीकडे

  • श्रीलंकेचा डाव १७४ धावांमध्ये आटोपला
  • श्रीलंकेला आठवा धक्का; एम्बुल्डेनिया भोपळा न फोडता माघारी मोहम्मद शमीने घेतला बळी
  • श्रीलंकेला लागोपाठ दोन धक्के; जडेजाने श्रीलंकेच्या लकमल आणि डिकवेला या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
  • ५८ व्या षटकाच बुमराहने श्रीलंकेला चारिथ असलंकाच्या रूपात पाचवा गडी बाद केला. त्याने  २९ धावा केल्या.
  • ५४ व्या षटकांत श्रीलंकेच्या पाठुम निस्संकाने आपले अर्धशतक पुर्ण केले.
  • ५० षटकांनंतर श्रीलंकेने ४ गडी गमावत १५० धावा केल्या आहेत
  • निस्सांकाला ४७ व्या षटकांत जीवदान
  • चरिथ असलांका आणि पथुम निस्सांका मैदानात
  • तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT