Latest

श्रीनगर येथे मिग-२९ लढाऊ विमानांची तुकडी तैनात; शत्रूंचा मुकाबला करण्यास सक्षम

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यातील 'मिग-२९'  विमानांची तुकडी पाकिस्तान आणि चिनी आघाडीच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी तुकडी तैनात केली आहे.

पायलट स्क्वॉड्रन लीडर शिवम राणा यांनी सांगितले की, अपग्रेड केलेले विमान रात्रीच्या वेळी नाईट व्हिजन गॉगल्ससह ऑपरेट करू शकते आणि हवेतून हवेत इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे त्यांची रेंज जास्त आहे.

"आम्ही एअर-टू-ग्राउंड शस्त्रास्त्रांचाही समावेश केला आहे जो पूर्वी नव्हता. विमानांची सर्वात मोठी क्षमता म्हणजे वैमानिक ज्यांना भारतीय हवाई दलाने या विमानांवर सेवा देण्यासाठी निवडले आहे.

श्रीनगर काश्मीर खोऱ्याच्या मध्यभागी आहे. त्याची उंची मैदानापेक्षा जास्त आहे. सीमेच्या जवळ असल्यामुळे अधिक वजन-ते-थ्रस्ट गुणोत्तर आणि कमी प्रतिसाद वेळ असलेले विमान ठेवणे धोरणात्मकदृष्ट्या चांगले आहे. ते अधिक चांगल्या एव्हियोनिक्स आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. मिग-२९ हे सर्व निकष पूर्ण करते ज्यामुळे दोन्ही आघाड्यांवर शत्रूंचा मुकाबला करण्यास सक्षम आहोत, असे भारतीय हवाई दलाचे पायलट स्क्वाड्रन लीडर विपुल शर्मा यांनी माहिती दिली.

SCROLL FOR NEXT