Latest

IND vs WI : कर्णधार हार्दिक आज संघात करणार मोठे बदल?

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताविरूध्द कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर, वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारताविरुद्ध जोरदार पुनरागमन केले. वेस्ट इंडिजने पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये धमाकेदार क्रिकेट खेळून भारताला पराभूत केले. विंडीज संघ आज (दि.८)होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. (IND vs WI 3rd T20)

मालिकेतील आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला करो या मरो सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. हा सामना आज (दि.८)  भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून गयाना येथील प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. (IND vs WI 3rd T20)

हार्दिक आज संघात करणार मोठे बदल?

हार्दिक पंड्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसे बदल करण्यासाठी ओळखला जात नाही. पहिल्या दोन सामन्यातील संघाची कामगिरी लक्षात घेता टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात बरेच बदल करू शकतो. इशान किशन आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप ठरली आहे. अशा स्थितीत यशस्वी जैस्वालला संधी दिली जाऊ शकते.

आणखी एका वेगवान गोलंदाजाला संघात स्थान मिळण्याची शक्यता

याशिवाय अक्षर पटेलच्या जागी आणखी एका वेगवान गोलंदाजाला संघात स्थान मिळू शकते. वास्तविक, शेवटच्या सामन्यात कर्णधार हार्दिकने अक्षरचा गोलंदाज म्हणून वापर केला नाही. सामन्यात फलंदाजी करताना त्याने १४ धावा केल्या. तर पहिल्या टी-20 मध्ये अक्षरला फक्त दोन षटके मिळाली. यामुळे उमरान मलिकला टीम इंडियाच्या प्लेइिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.

भारत संभाव्य प्लेइंग इलेव्हन : इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल/यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

वेस्ट इंडिज संभाव्य प्लेइंग इलेव्हन : ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT