स्पोर्ट्स

Ind Vs Sri : भारताचा दणदणीत विजय, श्रीलंकेचा डावाने पराभव

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क ः माेहाली कसाेटीत भारताने एक डाव आणि २२२ धावांनी भारताने श्रीलंकेचा पराभव केला आहे. पंजाब क्रिकेट असोशिएशन स्टेडिअम मध्ये सुरू असलेल्या या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात ५७४ धावा केल्या. यानंतर डाव घोषित केला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. तर रविंद्र जडेजा हा सामनावीर ठरला आहे,

श्रीलंका पहिल्या डावात १७४ धावांपर्यंतच मजल मारू शकली. त्यानंतर भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिला. फॉलोऑन दिल्यानंतरही श्रीलंकेचा दुसर्‍या डाव १७८ धावांवर आटाेपला.

भारताच्‍या पहिल्‍या डावात रविंद्र जडेजाने २२८ चेंडूंमध्ये १७५ धावांची दमदार खेळी केली होती. ऋषभ पंतनेही ९७ धावांमध्ये ९६ धावा करत भारताचा स्कोर उभा केला. रविंद्र जडेजा द्विशतकाजवळ असतानाच भारताने आपला डाव ५७४ धावांवर घोषित केला. तर हनुमा विहारीने १२८ चेंडूंमध्ये ५८ धावांची खेळी करत अर्धशतक झळकावले हाेते. (Ind Vs Sri)

श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावात जडेजाने ४ बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विनने ३ विकेट्स घेतल्या. जडेजाच्या अचूक माऱ्यासमोर श्रीलंकन संघाने नांगी टाकली. श्रीलंकेकडून एन. डिकवेला याने ६९ चेंडूंमध्ये ४९ धावांची कामगारी केली. (Ind Vs Sri)

SCROLL FOR NEXT