Latest

IND vs SL : ‘श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पंत, हुड्डा बसणार कट्ट्यावर’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SL : आशिया कपच्या सुपर 4 फेरीत आज टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असून टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर क्रिकेट वर्तृळात जोरदार चर्चा झडत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आणि वीरेंद्र सेहवाग यांनीही आपले मत मांडले आहे. साखळी सामन्यातील (पाकिस्तान विरुद्ध) पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये दिनेश कार्तिकचा समावेश केला होता. पण नंतरच्या सामन्यात त्याला वगळण्यात आले, यावर सेहवाग चांगलाच नाराज दिसत आहे. (IND vs SL)

क्रिकेट विषयीची विशेष वेबसाईट क्रिकबझला सेहवागने मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्याने स्पष्टपणे सांगितले की, 'श्रीलंकेविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. फायनलमध्ये प्रवेश करायचा झाल्यास हा सामना जिंकावाच लगेल. त्यासाठी संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करणे आवश्यक आहे. संघ व्यवस्थापण आणि रोहित शर्माही यावर नक्कीच विचार करेल. त्यामुळे पहिल्या सामन्यात खेळलेला डीके (दिनेश कार्तिक) प्लेईंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करेल आणि ऋषभ पंतला बाहेर बसवले जाईल. याला अजय जडेजानेही दुजोराला दिला. दुसरीकडे, दीपक हुडाला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाईल आणि त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळेल, असे भाकीत जडेजाने केले आहे. (IND vs SL)

या दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी सांगितले की, अशा प्रकारे टीम इंडियाच्या डावखुऱ्या फलंदाजाची कमतरताही पूर्ण होईल आणि संघाला फिनिशरही मिळेल. खरं तर, रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे आणि अशा स्थितीत संघाकडे डावखुरा फलंदाज म्हणून मर्यादित पर्याय आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. आता ऋषभ पंत आणि अक्षर पटेल हेच पर्याय उरले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. (IND vs SL)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT