Latest

IND vs SL Test : रोहितच्या निर्णयामुळे जडेजाचे हुकले द्विशतक; चर्चा पुन्हा द्रविडच्या ‘त्या’ निर्णयाची

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) मोहाली कसोटी (IND vs SL Test) सामन्यात 175 धावांची नाबाद खेळी खेळली, जडेजा 175 धावांवर असताना कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) डाव घोषित केला. म्हणजेच जडेजाला कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावता आले नाही. ज्यानंतर चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 15 ते 20 मिनिटे जास्त दिली असती तर जडेजाने द्विशतक झळकावले असते असे चाहत्यांना वाटते, पण वेळ पाहून कर्णधार रोहितने डाव घोषित केला.

सर जडेजाने कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. 175 धावांच्या संस्मरणीय खेळीत जडेजाने 228 चेंडूंचा सामना करत 17 चौकार आणि 3 षटकार ठोकले. जडेजाची खेळी अप्रतिम होती. प्रथम, जडेजाने अश्विनसोबत 7 व्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली, नंतर मोहम्मद शमी सोबत जडेजाने 9 व्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. (IND vs SL Test)

चाहत्यांना आठवली राहूल द्रविडची घटना

रोहितने डाव घोषित करताच चाहत्यांना राहुल द्रविडची (rahul dravid) घटना आठवली, जेव्हा डाव घोषित केल्यामुळे सचिनचे (sachin tendulkar) द्विशतक झळकावता आले नाही. 2004 साली ही घटना पाकिस्तान दौऱ्यावर घडली होती. त्या कसोटी सामन्यात सेहवागने 309 धावा केल्या होत्या आणि सचिनही 194 धावांवर नाबाद होता, तेव्हा कर्णधार द्रविडने भारताचा डाव घोषित केला होता. सचिनने आपल्या पुस्तकातही या घटनेचा उल्लेख केला आहे.

आता रोहितने जडेजाशी अगदी तशीच वागणूक देऊन चाहत्यांमध्ये ती जुनी आठवण ताजी केली आहे. गंमत म्हणजे यावेळी भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. जडेजाने 175 धावा करत एक खास विक्रम केला आहे. भारतासाठी ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना जडेजा सर्वात मोठी खेळी खेळणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने असे करून कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. (IND vs SL Test)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT