Latest

IND vs SA T20 Series : दुखापतीमुळे केएल राहुल झाला भावुक, ट्विटमधून मांडली मनातील व्‍यथा…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दक्षिण आफ्रिकेविरुद्‍धची टी-२० मालिका (  IND vs SA T20 Series ) आजपासून सुरु होत आहे. मात्र या मालिकेत खेळण्‍याची संधी केएल राहुल याला मिळणार नाही. रोहित शर्माच्‍या अनुपस्‍थितीत त्‍यांच्‍याकडेच भारतीय संघाच्‍या धुरा देण्‍यात आली होती. मात्र दुखापतीमुळे त्‍याला या मालिकेला मुकावे लागले आहे. यामुळे भावूक झालेल्‍या केएल राहुल याने ट्विट करत आपल्‍या मनातील व्‍यथा व्‍यक्‍त केली आहे.

टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्‍ध टी-२० मालिकेत पाच सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज दिल्‍लीतील अरुण जेटली स्‍टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र या सामन्‍यापूर्वी दुखापत झाल्‍याने केएल राहुल याला मालिकेलाच मुकावे लागले आहे. टीम इंडियासाठी हा मोठा धक्‍का आहेच त्‍याचबरोबर केएल राहुल याच्‍यासाठीही ऐतिहासिक सामन्‍यात खेळण्‍याची संधी गमावणे व्‍यथित करणारे ठरले आहे. आजचा सामना जिंकल्‍यास सलग १३ सामने जिंकण्‍याचा विक्रम टीम इंडियाच्‍या नावावर होणार आहे. केएल राहुल याच्‍या जागी टीम इंडियाचे नेतृत्‍व यष्‍टीरक्षक ऋषभ पंत करणार आहे.

IND vs SA T20 Series: हे स्‍वीकारणे खपूच कठीण आहे…

केएल राहुल याने आपल्‍या ट्विट पोस्टमध्‍ये म्‍हटलं आहे की, 'हे स्‍वीकार करणं खूपच कठीण आहे;पण मी आजपासून नवीन आव्‍हान स्‍वीकारात आहे. प्रथम टीम इंडियाचा कर्णधार म्‍हणून मैदानात उतरता येणार नसल्‍याने मी खूपच निराश आहे. टीममधील प्रत्‍येक खेळाडूला माझे समर्थन असणार आहे. मला पाठिंबा दिल्‍याबद्‍दल सर्वांचे आभार. सर्व सहकार्‍यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्‍धच्‍या मालिकेसाठी शुभेच्‍छा'.

'बीसीसीआय'ने काय म्‍हटलं होते?

केएल राहुलच्‍या दुखापतीबद्‍दल माहिती देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) स्‍पष्‍ट केले होते की, केएल राहुल पोटावर मार लागल्‍याने दुखापतग्रस्‍त आहे. तर फिरकीपटू कुलदीप यादव याला नेट प्रॅक्‍टिसवेळी उजव्‍या हाताला दुखापत झाली आहे. या दोन्‍ही खेळाडूंना दक्षिण आफ्रिकाविरुद्‍धच्‍या टी -२० मालिकेत खेळता येणार नाही. निवड समितीने यष्‍टीरक्षक ऋषभ पंत याला कर्णधार तर हार्दिक पंड्या यांची उपकर्णधारपदी नियुक्‍ती केली आहे.

भारतीय संघ : ऋषभ पंत ( कर्णधार आणि यष्‍टीरक्षक ), हार्दिक पंड्‍या,ऋतुराज गायकवाड़, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्‍यर, दिनेश कार्तिक, वेंकटेश अय्‍यर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्‍णोई, भुवनेश्‍वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका संघ : टेम्‍बा बवुमा ( कर्णधार), क्‍किंटन डीकॉक ( यष्‍टीरक्षक) , रीजा हेंड्रिक्‍स, हेनरिक क्‍लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्‍हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नोर्किया, वेन पार्नेल, ड्रेन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्‍सी, ट्रिस्‍टन स्‍टब्‍स, रासी वान डेर डुसन आणि मार्को जॉनसेल

SCROLL FOR NEXT