Latest

IND vs SA : पावसाच्या सरीने केले खेळाडूंचे स्वागत

Arun Patil

जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये 10 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आफ्रिकेत दाखल झाला. आफ्रिकेतही भारतीय खेळाडूंचे पारंपरिक पद्धतीने स्वागत झाले. (IND vs SA )

भारतीय संघ आफ्रिकेला रवाना झाला, त्या क्षणापासून ते आफ्रिकेत दाखल होईपर्यंतच्या प्रवासाचे चित्रण करून 'बीसीसीआय'ने व्हिडीओ शेअर केला. ज्यावेळी भारतीय संघ आफ्रिकेत पोहोचला तेव्हा तिथे पाऊस पडत होता. अशावेळी पावसात भिजण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी भारतीय खेळाडू धावताना दिसत आहेत. आफ्रिकेच्या विमानतळावर उतरल्यावर बसमध्ये जाण्यासाठी ते डोक्यावर बॅग घेऊन पळत होते.

ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर लोळवून भारतीय संघ आफ्रिकेत 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल झाला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आतापर्यंत एकूण 24 टी-20 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी टीम इंडियाने 13 सामने जिंकले आहेत, तर 10 मध्ये हार झाली आहे. आगामी टी-20 मालिकेत या दोन संघांमधील कडवी झुंज लक्षवेधी ठरणार आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या या युवा टीमकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT