पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (दि.२ ऑक्टोबर) गुवाहाटी येथे होणार आहे. या सामन्यात भारताला नवीन विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे; परंतु नवा विक्रम करण्यासाठी 'ही' कामगिरी भारतीय संघाला करावी लागणार आहे. जाणून घेऊया टीम इंडियाला कराव्या लागणार्या कामगिरीबद्दल… (Ind Vs Sa 2nd T20)
भारताला दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. भारतीय संघाने आजपर्यंत भारताने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरूध्दची टी-२० मालिका जिंकलेली नाही. मालिकेतील पहिला सामना जिंकल्यामुळे भारतीय संघाला दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेविरूध्द विजय मिळवत नव्या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी निर्माण झाली आहे. (Ind Vs Sa 2nd T20)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही आठवी द्विपक्षीय टी-२० मालिका आहे. यामध्ये भारताने तीनवेळा तर दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा मालिका जिंकली आहे. दोन मालिका अनिर्णित राहिल्या. भारताने दक्षिण आफ्रिके त्याच्याच घरच्या मैदानावर तीनवेळा पराभूत केले आहे, मात्र घरच्या मैदानावर मालिकेत विजय मिळवता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने २०१६-१७ मध्ये भारतात तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली होती.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी टी-20 मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. गुवाहाटी येथे होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर असून, दुसरा सामना जिंकल्यानंतर आता मालिका जिंकण्याकडे लक्ष लागले आहे; पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. अशा स्थितीत पावसामुळे सामना होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा;