पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना रांचीत सुरू आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावांवर आटोपला. या खेळीत जो रूटने शतक झळकावले. आता इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ मैदानावर उतरला आहे.
अश्विन बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेल याला कुलदीप यादव याने साथ दिली. दोघांनी ४2 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत टीम इंडियाचा धावफलक हालता ठेवला. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ७ गडी गमावत २१९ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३४ धावांनी पिछाडीवर आहे.
५६ व्या षटकात १७७ धावांवर भारताला सातवा धक्का बसला. फिरकीपटू टॉम हार्टलेने अश्विनला पायचीत केले.
भारताला एकामागून एक धक्के बसले. यशस्वी पाठोपाठ भारताला सरफराज खानच्या रुपाने सहावा धक्का बसला. त्याला टॉम हार्टलेने ५२ व्या षटकात झेलबाद केले. सरफराजला ५३ चेंडूत केवळ १४ धावा करता आल्या.
त्यानंतर ४७ व्या षटकांत भारताला पाचवा मोठा धक्का बसला. शोएब बशीरने यशस्वी जैस्वालला बाद केले. यशस्वी ११७ चेंडूत ७३ धावा काढून माघारी परतला.
सामन्याच्या 37 व्या षटकात भारताचा चौथा फलंदाज बाद झाला. इंग्लंडचा गोलंदाज शोएब बशीरने त्याला ओली पोपकरवी झेलबाद केले. जडेजाने आपल्या खेळीत 12 बॉलमध्ये 12 धावा केल्या.
इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रजत पाटीदारच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला. त्याने इंग्लंडचा गोलंदाज शोएब बशीरने बाद केले. रजतने आपल्या खेळीत 42 चेंडूत 17 धावांची खेळी केली.
यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. या मालिकेतील हा त्याचा ५०+ चा चौथा स्कोअर आहे. भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात 110 हून अधिक धावा केल्या आहेत.
भारताला दुसरा धक्का ८६ धावांवर बसला. शोएब बशीरने शुभमन गिलला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला 38 धावा करता आल्या. शुभमनने यशस्वी जैस्वालसोबत ८२ धावांची भागीदारी केली. सध्या यशस्वी आणि रजत पाटीदार क्रीजवर आहेत.
भारताने एक विकेट गमावल्यानंतर 68 धावा केल्या आहेत. सध्या शुभमन गिल 27 धावा करून क्रीजवर आहे तर यशस्वी जैस्वालने 40 धावा केल्या आहेत. दोघांमध्ये ६० हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.
दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने पहिल्या डावात एक गडी गमावून 34 धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी जैस्वाल 27 धावा करून क्रीजवर असून शुभमन गिलने चार धावा केल्या आहेत. भारताला पहिला धक्का चारच्या स्कोअरवर बसला. दोन धावा करून रोहित अँडरसनचा बळी ठरला. भारत अजूनही इंग्लंडपेक्षा 319 धावांनी मागे आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर संपला. आज इंग्लंडने सात विकेट्सवर 302 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. संघाने 51 धावांची भर घालताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. रवींद्र जडेजाने तिन्ही विकेट घेतल्या. त्याच षटकात त्याने ऑली रॉबिन्सन आणि शोएब बशीरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजाने आधी रॉबिन्सन आणि जो रूटची 102 धावांची भागीदारी मोडली.
इंग्लंडच्या डावातील 103 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन्सन यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद झाला. त्याला 58 धावा करता आल्या. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने शोएब बशीरला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर त्याने जेम्स अँडरसनला एलबीडब्ल्यू आऊट करून इंग्लंडचा डाव 353 धावांवर आटोपला. अँडरसनला खातेही उघडता आले नाही.
भारताला पहिला धक्का चारच्या स्कोअरवर बसला. जेम्स अँडरसनच्या चेंडूवर दोन धावा काढून कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. अँडरसनने त्याला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. सध्या यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव 353 धावांवर गुंडाळला. आज इंग्लंडने सात बाद 302 धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. यामध्ये संघाने 51 धावांची भर घालताना उर्वरित तीन विकेट गमावल्या. गोलंदाजीमध्ये रवींद्र जडेजाने तिन्ही विकेट घेतल्या.
जडेजाने आधी रॉबिन्सन आणि जो रूटची १०२ धावांची भागीदारी फोडली. इंग्लंडच्या डावातील 103 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रॉबिन्सन यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद झाला. त्याला 58 धावा करता आल्या. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने शोएब बशीरला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर त्याने जेम्स अँडरसनला एलबीडब्ल्यू आऊट करून इंग्लंडचा डाव 353 धावांवर गुंडाळला. (IND vs ENG 4th Test)
गोलंदाजीमध्ये रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4, आकाश दीप 3, मोहम्मद सिराज 2 आणि अश्विनने 1 विकेट घेतली.
रवींद्र जडेजाने इंग्लंडच्या डावातील 103 व्या षटकात दोन विकेट घेत भारतीय संघाला सामन्यात आणले. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ऑली रॉबिन्सनला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 58 धावा केल्या. या
यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाने शोएब बशीरला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडने नऊ गड्यांच्या मोबदल्यात 352 धावा केल्या आहेत. सध्या जो रूट 121 धावांवर असून जेम्स अँडरसन क्रीजवर आहे.
इंग्लंडला 347 च्या स्कोअरवर आठवा आणि आजचा पहिला धक्का बसला. रवींद्र जडेजाने ऑली रॉबिन्सन आणि जो रूट यांच्यातील १०२ धावांची भागीदारी मोडली. रॉबिन्सन 96 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. त्याला जडेजाने यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या हाती झेलबाद केले.
ऑली रॉबिन्सनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आहे. जो रूट आणि ऑली रॉबिन्सन दोघांनी इंग्लंडला मजबूत स्थितीत आणले आहे. भारतीय संघाला ही भागीदारी लवकरात लवकर तोडावी लागणार आहे. दोघांमध्ये 80 हून अधिक धावांची भागीदारी झाली आहे.
हेही वाचा :