Latest

IND vs ENG Ranchi Test : रुटचे 13 डावांनंतर शतक! इंग्लंडची धावसंख्या तीनशे पार

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG Ranchi Test : रांची येथे खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीत जो रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात आपला संघर्ष सुरूच ठेवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने 7 बाद 302 धावा केल्या आहेत. रूट (नाबाद 106) आणि ऑली रॉबिन्सन (नाबाद 31) क्रीजवर आहेत. दोघांमध्ये 57 धावांची भागीदारी झाली आहे.

रांची कसोटीचे पहिले सत्र भारताच्या नावावर राहिले. पदार्पणाचा सामना खेळणा-या वेगवान गोलंदाज आकाश दीपने इंग्लंडची आघाडीची फळी उखडून टाकली. त्याने बेन डकेट (11), ऑली पोप (0) आणि जॅक क्रोली (42) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर फिरकीपटू अश्विनने आपली जादू दाखवली आणि जॉनी बेअरस्टोला (38) तंबूचा रस्ता दाखवला. तर रवींद्र जडेजानेही बेन स्टोक्सला (3) माघारी धाडले. अशाप्रकारे लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये गेला.

अशाप्रकारे लंचपर्यंत पहिल्या सत्रात इंग्लंडने पाच विकेट गमावून 112 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या सत्रात चहापानाच्या वेळेपर्यंत रूट आणि बेन फॉक्स यांनी एकही विकेट पडू दिली नाही. त्या सत्रात दोघांनी मिळून 86 धावा जोडल्या. तिसऱ्या सत्रात सिराजने टीम इंडियाचे कमबॅक केले. त्याने रूट आणि फॉक्सची 113 धावांची भागीदारी मोडली. फॉक्सचे अर्धशतक हुकले. तो 47 धावा करून सिराजच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याचवेळी टॉम हार्टले 13 धावा करून सिराजच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर रूटने ऑली रॉबिन्सनसह इंग्लंडचा डाव पुन्हा सांभाळला आणि कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली आहे. तिसऱ्या सत्रात इंग्लंडने 29 षटकांत दोन गडी गमावून 104 धावा केल्या. भारताकडून आतापर्यंत आकाशने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी सिराजला दोन विकेट मिळाल्या. रवींद्र जडेजा आणि अश्विनला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दोन्ही संघाचे प्लेइंग इलेवन

भारत (प्लेइंग इलेवन) : यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

इंग्लंड (प्लेइंग इलेवन) : जैक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स एंडरसन.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT