Latest

IND VS BAN ONE DAY : इशान किशनचा व्‍दिशतकी धमाका, विश्‍वविक्रमाला गवसणी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्‍या सामन्‍यामध्‍ये सलामीवीर इशान किशनने आपल्‍या कारकीर्दीतील सर्वोत्‍कृष्‍ट फलंदाजीचे दर्शन घडवत व्‍दिशतक झळकावले. या सामन्‍यात इशान किशनने आपले शतक झळकावले.  यानंतर त्‍याने १२६ चेंडूत ९ षटकार आणि २४ चौकार फटकावत आपलं व्‍दिशतक पूर्ण केले. शतक न झळकवता थेट व्‍दिशतकी खेळी करत त्‍याने  विश्‍वविक्रमाला गवसणी घातली आहे. तसेच  इशानचे व्‍दिशतक आतंरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान व्‍दिशतक ठरले आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्‍ट इंडिजचा ख्रिस गेल याच्‍या नावावर होता. त्‍याने १३८ चेंडूत व्‍दिशतक झळकावले होते. ( IND VS BAN ONE DAY )

नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाचव्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. शिखर धवनला मेहदी हसनने पायचित केले. यानंतर इशान किशन याने विराटच्‍या मदतीने भारताचा डाव सावरला.

इशानचा झंझावात : ९ षटकार आणि २४ चौकार

ईशान किशनला बऱ्याच दिवसांनी भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्‍याने या संधीचे सोने केले. रोहितच्या जागी आलेल्या किशनने आपले. शतक पूर्ण केले. यानंतर त्‍याने १०३ चेंडूत १५० धावा पूर्ण करत. वीरेंद्र सहवान यांचा विक्रम तोला. सहवान याने वेस्‍ट इंडिज विरुद्‍ध इंदौरमधृये ११२ चेंडूत १५० धावा केल्‍या होत्‍या. इशान किशन याचे पहिलेच शतक ठरले होते. यानंतर त्‍याने १२६ चेंडूत ९ षटकार आणि २४ चौकार फटकावत आपलं व्‍दिशतक पूर्ण केले.शतक न झळकवता थेट व्‍दिशतकी खेळी करणार तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.तसेच  इशानचे व्‍दिशतक आतंरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान व्‍दिशतक ठरले आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्‍ट इंडिजचा ख्रिस गेल याच्‍या नावावर हा विक्रम होता. त्‍याने  २०१५ मध्‍ये झिम्‍बाब्‍वे विरुद्‍ध १३८ चेंडूत व्‍दिशतक झळकावले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT