Latest

IND vs AUS 1st Test Day 3 : दुसर्‍या डावात ५२ धावांवर ऑस्‍ट्रेलियाचा निम्‍मा संघ तंबूत

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ऑस्‍ट्रेलियाच्‍या दुसर्‍या डावाची सुरुवातही खराब झाली आहे. फिरकीपटू आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनी ऑस्‍ट्रेलियाच्‍या फलंदाजांना स्‍थिरावून दिले नाही.  आर. अश्‍विनने सलामीवीर उस्‍मान ख्‍वाजा याला पाच धावांवर बाद केले. यानंतर रवींद्र जडेजाच्‍या फिरकीची जादू चालली. त्‍याने १७ धावांवर खेळत असलेल्‍या मार्नस लाबुशेन याला पायचीत केले. यानंतर १८ व्‍या षटकात अश्‍विनने ६ धावांवर खेळणार्‍या पीटर हैंड्सकॉम्बला पायचीत केले.

अश्‍विनचे ऑस्‍ट्रेलियाला सलग दोन धक्‍के

 १४ व्‍या षटकामध्‍ये अश्‍विनने १० धावांवर खेळणार्‍या डेव्‍हिड वॉर्नरला आर. अश्‍विनने पायचीत केले.  ऑस्‍ट्रेलियाच्‍या संघाने ३ गडी गमावत ३५ धावा केल्‍या आहेत. यानंतर १६ व्‍या षटकात दोन धावांवर खेळणार्‍या मॅट रेनशॉला अश्‍विनने पायचीत केले.

भारताला २२३ धावांची आघाडी, अक्षर पटेलचे शतक थोडक्‍यात हुकले

भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या आहेत. यामुळे भारताने ऑस्ट्रेलियावर २२३ धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करून भारताचा पहिला डाव संपवला. अक्षर पटेलने १७४ चेंडूत ८४ धावा केल्या.

आज (दि.११) सामन्‍याच्‍या तिसऱ्या दिवशी ३२८ धावांवर भारताची आठवी विकेट पडली. रवींद्र जडेजा १८५ चेंडूत ७० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार मारले. तो मर्फीचा सहावा बळी ठरला.  ३८० धावांच्या स्कोअरवर भारताची नववी विकेट पडली. मोहम्मद शमी ४७ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. शमीने अक्षर पटेलसोबत ५२ धावांची भागीदारी केली. त्याला १३२ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूत मर्फीने अॅलेक्स कॅरी करवी झेलबाद केले. पॅट कमिन्सने अक्षर पटेलला क्लीन बोल्ड करून भारताचा पहिला डाव संपवला. अक्षर पटेलने १७४ चेंडूत ८४ धावा केल्या. त्याचे शतक हुकले पण त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने 223 धावांची आघाडी घेतली.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने सामन्याच्या दुसर्‍या दिवशी पाहुण्या कांगारूंवर वर्चस्व राखले होते. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र कांगारूंचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावाची धावसंख्या ४०० वर नेली. ऑस्‍ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फी सात, पॅट कमिंसने २ तर नॅथन लयान १ विकेट घेतली.

रोहित शर्माचे दमदार शतक

कर्णधार रोहित शर्माने झुंझार शतक झळकावले. रोहित शर्माचे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटच्‍या तिन्‍ही फॉर्मेटमधील हे ४३ वे शतक ठरले. तर कसोटी क्रिकेटमधील ९ वे शतक आहे. रोहितने यावर्षी २४ जानेवारीला न्‍यूझीलंड विरुद्ध शतक झळकावले होते. एकीकडे ऑस्‍ट्रेलियाचे फिरकीपटू मॅर्फी व नॅथन टीम इंडियाच्‍या दिग्‍गज फलंदाजांना चकवत असतानाच रोहित शर्माने उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन करत आपलं शतक पूर्ण केले. ( Rohit Sharma century ) आत्‍मविश्‍वासाने भरलेल्‍या या खेळीत १७१ चेंडूत त्‍याने १४ चौकार आणि २ षटकार फटकावले.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांवर आटोपला

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला. रविचंद्रन अश्विनने स्कॉट बोलंडला क्लीन बोल्ड करून कांगारू संघाचा डाव संपवला. बोलंडला आपले खातेही उघडता आले नाही. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लबुशेनने सर्वाधिक 49 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 37 आणि अॅलेक्स कॅरीने 36 धावा केल्या. त्याचवेळी पीटर हँड्सकॉम्ब 31 धावा करून बाद झाला. या चौघांशिवाय एकाही कांगारू फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. तीन खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. भारताकडून रवींद्र जडेजाने पाच आणि अश्विनने तीन बळी घेतले. मोहम्मद शमी आणि सिराजला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय वेगवान गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली. दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजाला पायचित पकडले आणि तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतरच्या पुढच्या तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला बाद लागोपाठ दुसरा झटका दिला. यावेळी कांगारूंची धावसंख्या 2 बाद 2 होती. यानंतर मार्नस लबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला आणि उपाहारापर्यंत विकेट पडू दिली नाही.

उपाहारानंतर जडेजाने आपल्या फिरकीची जादू दाखवली आणि 35 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंत लबुशेन आणि रॅनशो यांना बाद करून भारताला यश मिळवून दिले. लबुशेनला केएस भरतने यष्टीचीत केले, तर रॅनशो पायचित झाला. त्यानंतर जडेजाने 42 व्या षटकात स्टीव्ह स्मिथला बोल्ड करून भारताला आणखी एक मोठे यश मिळवून दिले. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या पाच बाद 109 धावांवर होती. स्मिथने 37 धावा केल्या. यानंतर अश्विनने आघाडी घेतली आणि अॅलेक्स आणि कमिन्सला बाद केले. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच जडेजाने पीटरला बाद केले. त्यानंतर अश्विनने स्कॉट बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 177 धावांवर संपवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT