Latest

IND-UAE Agree on Trade Settlement : ‘RBI’ आणि UAE ची ‘सेंट्रल बँक’ यांच्यात महत्वपूर्ण करार; UPI-IPP लिंकिंगवर सहमती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसीय युएई (UAE) दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी भारत-युएई द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी व्यापक चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी चलनात व्यापार करार सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा संपवून पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी अबुधाबीला पोहोचले. (IND-UAE Agree on Trade Settlement)

भारत-यूएई व्यापारात २० टक्के वाढ

यूएई अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या वर्षी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी झाल्यापासून भारत-यूएई व्यापारात २० टक्के वाढ झाली आहे. प्रथमच, आम्ही ८५ अरब अमेरिकी डॉलर्स इतक्या व्यापाराचे लक्ष्य गाठले आहे. लवकरच आम्ही १०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठू. (IND-UAE Agree on Trade Settlement)

'या' करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळेल

जर आपण दृढनिश्चय केला तर G20 च्या आधी आपण हा टप्पा पार करू शकतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही देशांच्या चलनातील व्यापारावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी झालेल्या करारातून दोन्ही देशांमधील मजबूत आर्थिक सहकार्य आणि परस्पर विश्वास दिसून येतो. या करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. (IND-UAE Agree on Trade Settlement)

यूएईच्या भेटीदरम्यान मोदींनी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांना सांगितले की, आमच्या देशांमधील संबंध ज्या प्रकारे विस्तारले आहेत त्यात तुमचे मोठे योगदान आहे. भारतातील प्रत्येकजण तुम्हाला खरा मित्र मानतो. यूएई मध्ये होणाऱ्या COP-28 ची तयारी यूएई अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सुरु असल्याचेही मोदी म्हणाले. त्यांनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या परिषदेला उपस्थित राहण्याचे ठरवले आहे.

RBI आणि UAE ची सेंट्रल बँक यांच्यात २ महत्वपूर्ण करार

भारतीय रिझर्व बँक आणि संयुक्त अरब अमीरातमधील सेंट्रल बँक यांच्यात, शनिवारी दोन्ही देशांतील स्थानिक चलनांचा वापर आणि त्यांच्या पेमेंट सिस्टिमच्या परस्पर संबंधावर सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब झाला. अबूधाबीमध्ये मोदी आणि युएईचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या उपस्थितीत दोन करारांची देवाणघेवाण झाली. (IND-UAE Agree on Trade Settlement)

UPI-IPP लिंकिंग वरही दोन्ही देशांची सहमती

पेमेंट्स आणि मेसेजिंग सिस्टम्सवरिल कराराअंतर्गत, दोन्ही देशांच्या केंद्रीय बँकांनी जलद पेमेंट सिस्टम्स (FPS) – भारताच्या UPI ला UAE च्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्म (IPP) शी जोडण्यासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शविली. हे संबंधित कार्ड स्विचेस आणि भारताची पेमेंट मेसेजिंग सिस्टम UAE मधील मेसेजिंग सिस्टमशी लिंक करेल. (IND-UAE Agree on Trade Settlement)

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT