Latest

LPG ग्राहकांचे बजेट बिघडले! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींत वाढ, आजपासून नवीन दर लागू

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : १ फेब्रुवारीच्या पहाटे एलपीजी ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. देशाच्या अर्थसंकल्पाच्या दिवशी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर वाढवून ग्राहकांचे बजेट बिघडवले आहे. हिवाळ्याच्या हंगामात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींवर परिणाम झाल्याने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. गेल्या महिन्यातही तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १.५० रुपयांनी वाढवल्या होत्या. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर तो १७६९.५० रुपयांवर पोहोचला आहे. कोलकातामध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १८८७ रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत १७२३.५० रुपये तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १९३७ रुपयांवर पोहोचली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT