Latest

खा. राहुल शेवाळें विरोधात तरुणी न्यायालयात; पीडितेने ट्विटरवर अपलोड केला व्हिडीओ

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह सरकारवर बलात्कारपीडित तरुणीने गंभीर आरोप करत मी अजूनही लढत असल्याचे सांगताना अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात न्यायासाठी दाद मागितली, अशी माहिती ट्विटरवर व्हिडीओ अपलोड करून दिली आहे. तिने राहुल शेवाळेंविरोधात सीआरपीसी कायद्याच्या कलम १५६ (३) अन्वये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे येत्या काळात शेवाळेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पीडितेने ट्विटरवर व्हिडीओच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, मी बलात्कारपीडित आहे. राहुल शेवाळेंविरोधात माझा लढा सुरू आहे. मागील १० महिन्यांपासून शेवाळे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी विविध ठिकाणी जात असून तक्रारी केल्या आहेत, मात्र कोणीही आपली तक्रार नोंदवून घेत नाहीत. कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही, कारण शेवाळे हे सरकारमधील खासदार आहेत. खासदार राहुल शेवाळे यांना हे सरकार पाठीशी घालत असून त्यामुळेच गुन्हा नोंदवला जात नसल्याची खंत तिने व्हिडीओत मांडली आहे.

महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. खास करून राहुल शेवाळे यांच्यासारखे राजकीय नेते आहेत तोपर्यंत असे घडतच राहील. आज मी बळी पडली आहे. उद्या कुणी दुसरी असेल, अशी खंतही व्यक्त करताना तिने आता राहुल शेवाळे यांच्याविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार केल्याचे सांगितले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT