Latest

गेल्या 9 वर्षांत अतिवृष्टीचे देशात 17 हजार बळी

दिनेश चोरगे

नवी दिल्ली :  2012 ते 2021 या 9 वर्षांत देशात अतिवृष्टी आणि पुराच्या घटनांत 17 हजारांहून अधिक जणांचे बळी गेले. सरकारने राज्यसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरात म्हटले आहे की, कमी काळात प्रचंड पाउस पडण्याच्या घटनांत वाढ झाल्याने शहरी भागांत पूरस्थिती निर्माण होण्याच्या घटनांत वाढ झाल्याचे म्हटले आहे.

जलशक्ती राज्यमंत्री विश्वेश्वर टुडू म्हणाले की, शहरी भागांत पूर येण्यामागे अनेक बाबी कारणीभूत आहेत. त्यात कमी वेळात जास्त पाउस पडण्याच्या घटना वाढल्या आहेत तसेच अनियोजित विकास, नैसर्गिक जलस्त्रोतांवर अतिक्रमण आणि खराब जलनिस्सारण व्यवस्था यामुळेही शहरांत पूरस्थिती निर्माण होत आहे.

SCROLL FOR NEXT